लोकांचे कामे कामे जलद गतीने करण्याकरिता महिला वंचित बहुजन तर्फे अधिकाऱ्यांना रक्षाबंधन .
रविवार, 24 अगस्त 2025
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्त संकलन
साकोली :- साकोली येथे ठीक ठिकाणी विविध कार्यालयात विविध दाखल्याच्या नावानं फार मोठ्या प्रमाणात चक्र मारावे लागतात .त्यांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास कर्मचारी देतात. महिलांना तर मोठ्या प्रमाणात त्रास होतो. महिलांना पाहिजे त्या प्रमाणात अनुभव नसतो कोणाला तरी आधार घेऊन ते महिलांना कामे करावा लागतात आणि म्हणून हे काम महिलांना त्रास देता का, मुकाट्याने लवकरात लवकर व्हावे आणि महिलांवर होणारे अन्याय,
अत्याचारापासून अधिकाऱ्यांनी दक्ष रहावे या दृष्टिकोनातून भंडारा जिल्हा महिला वंचित बहुजन आघाडी पुढाकार घेऊन सर्व अधिकाऱ्यांना रक्षाबंधन केले. सर्वप्रथम साकोली येथील पोलीस ठाण्याचे ठाणेदार महादेव आचरेकर यांना रक्षाबंधन करून त्यांना समोरील कार्याच्या शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे साकोली येथील तहसीलदार संदीप कदम यांना सुद्धा राखी बांधण्यात आली. त्याचप्रमाणे वन विभागाचे आर. एफ . ओ कटरे साहेब यांना सुद्धा राखी बांधण्यात आली .असेच नायब तहसीलदार शेंडे यांना सुद्धा राखी बांधण्यात आली .असे विविध अधिकाऱ्यांना राख्या बांधून त्यांनी कर्तव्यदक्ष असावे याकरिता राखी बांधण्यात आली असे मत प्रतिनिधी कडे व्यक्त करण्यात आले .
8 याप्रसंगी वंचित बहुजन आघाडी महिला जिल्हाध्यक्ष तनुजा नागदेवे, कोकिळा रामटेके, सविता वालदे व इतरही महिला या प्रसंगी उपस्थित होते.
0 Response to "लोकांचे कामे कामे जलद गतीने करण्याकरिता महिला वंचित बहुजन तर्फे अधिकाऱ्यांना रक्षाबंधन ."
एक टिप्पणी भेजें