रोडपाली ठाकूरवाडी फुडलँड कंपनीच्या समोर रस्त्याची अतिशय दुरावस्था झाल्याने नागरीक त्रस्त..!
रविवार, 24 अगस्त 2025
Comment
• दलीत पँथर रायगड जिल्हा अध्यक्ष मनोज गायकवाड यांचे सहकार्य
सोनू संजीव क्षेत्रे
"साप्ताहिक जनता की आवाज"
पनवेल :- रोडपाली ठाकूरवाडी फुडलँड कंपनीच्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असल्याने वाहनधारकांना तारेवरची कसरत करत जीवघेणा प्रवास करावा लागत होता. संबंधित विभागाने वेळीच लक्ष घालून रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी दलीत पँथर संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष मनोज गायकवाड यांनी केली असता संबधित अधिकारी वर्गाने तातडीने लक्ष वेधून काम पूर्ण केले आहे
या रस्त्याची दुरावस्था झाली असून अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष होत होते . या मार्गावरील गावातील नागरीकांना उद्योग, व्यवसाय, शाळा, नोकरी, रुग्णालय महाविद्यालयीन शिक्षणासाठी नागरीकांना समस्त ग्रामस्थांना रोज प्रवास करावा लागत होता. अशा या खड्डेमय झालेल्या रस्तावरुन जीव मुठीत घेत जीवघेणा प्रवास करावे लागत असून रात्रीच्या वेळी खड्डय़ाचा अंदाज येत नसल्याने सातत्याने अपघात होत आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब पडवळ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष घनश्याम भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली दलीत पँथर संघटनेकडे मागणी करत रायगड जिल्हा अध्यक्ष मनोज गायकवाड यांनी मागणी पुर्ण केले आहे.
0 Response to "रोडपाली ठाकूरवाडी फुडलँड कंपनीच्या समोर रस्त्याची अतिशय दुरावस्था झाल्याने नागरीक त्रस्त..! "
एक टिप्पणी भेजें