विदर्भवादी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जन आक्रोश आंदोलन संपन्न
शुक्रवार, 22 अगस्त 2025
Comment
• 954 शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे अर्ज जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर
"साप्ताहिक जनता की आवाज"
वुत्त सकंलन
भंडारा: - विदर्भवादी शेतकरी संघर्ष समिती च्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकरिता दिनांक 21 ऑगस्ट 2025 ला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनआक्रोश आंदोलनाचे अजून करण्यात आलेले होते. या आंदोलनाचे नेतृत्व विदर्भवादी शेतकरी संघटनेचे नेते सदानंद धारगावे यांनी केले. या जन आक्रोश आंदोलनाच्या प्रमुख मागण्यांमध्ये शेतकऱ्यांची तात्काळ कर्जमाफी करण्यात यावी, सन २००६ ला पारित झालेला स्वामीनाथन आयोग तात्काल लागू करण्यात यावा, अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झालेले आहे एकरी 50,000/ हजार रुपये अनुदान देण्यात यावे, शेतकरी, शेतमजूर, श्रावण बाळ, विधवा महिला ,निराधार व अपंग यांना प्रति महिना 6000/ हजार रुपये देण्यात यावे व्यापारी फेडरेशन ला 5 किलो ओलावा घेतात ते रद्द करण्यात यावे, विजेचे बिल तात्काळ माफ करण्यात यावे ,शेतकऱ्या, 15 ऑक्टोंबर पर्यंत धानाचे काटे सुरू करण्यात यावे, प्रकल्पग्रस्त सुशिक्षित दिवसाचे बेरोजगार आरक्षण ५ टक्के ऐवजी 15 टक्के करण्यात यावे, समृद्धी महामार्ग करिता शेतकऱ्यांची जमीन संपादित करत आहात त्यांच्या जमिनीचा मोबदला ठरविण्यात यावा, याबाबत सविस्तर वृत्त असे की ,सततचे 4 ते 5 वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे पीक होत नाही त्यामुळे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे पिकाच्या सामना करावा लागतो आणि वारंवार अवकाळी पाऊस पडतो व शेतकऱ्यां चे पीक भुईसपाट होते. त्यामुळे शेतकऱ्यांवर कर्जाच्या डोंगर उभा झालेला आहे .काही शेतकऱ्यांना गहाण ठेवून बँकेचे व सहकारी संस्थेचे कर्ज भरावे लागते. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहे. आणि शेतकऱ्यांवर नाईराजास्त आत्महत्या करण्याची वेळ येत आहे . त्यामुळे शासनाने तात्काळ कर्जमाफीची घोषणा करावी आणि शेतकऱ्यांचे जीव वाचवावे . मागण्या मंजूर न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघर्ष समितीतर्फे जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात केले आहे. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी भंडारा मार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, भारताचे कृषिमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आलेले आहे . यावेळी जिल्हाधिकारी भंडारा यांना विदर्भवादी संघर्ष समितीमार्फत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे अर्ज भरून देण्यात आले. त्यात खालील गावांचा समावेश आहे चिखली 10 ,दिघोरी मोठी 5 ,लोणारा 23, ब्राह्मणी 10, ईटगाव 43, वासेळा 9 गोसेखुर्द 6, कुर्जा 9 ,कोंडा 17 ,चिचाड 6, आकोट 22 , वलनी 41 , शिवनाळा 11, कोदुरली 15 , भेंडाळा11, धानोरी 2 ,भोजापूर 16, वळेगाव 2,मांगली 19, सेंद्रिखुर्द,7,सेंद्रिय बुद्रुक 15 कोसरा 11, लावडी 9,विरली बुद्रुक 28, बोरगाव 24 ,खैरी तेलोता 5, फनोली 17 , भावड 6,अत्री7 बाचेवाडी 11, ब्रह्मी 14, पिंपळगाव11,पिलांद्री 16 तिरी 4,करलेवाडा 15, कमकाझरी 17 , मिंसी 27, चकारा,16,गोलेवाडी 12 ,उमरी 9, विरली कंदार 24, खैरी तिरी 10 , माडगी 2, टेकेपार 9 , चोवा 13, मेंढा 7, बासोरा 17, गराडा खुर्द 50, नवेगाव 3, सोनेगाव 5 बोरगाव बुद्रुक 12, मानेगाव 31, वाकेश्वर 31 ,चिखलपहेला 22 ,बोरगाव खुर्द 2,निमगाव 23, चांदोरी 12, अड्याळ 45 , खैरेदिवाण ६१ ,पचखेडी 4 अंबाडी 11, असे एकूण 954 अर्ज जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात सादर करण्यात आले.आंदोलन यशस्वी करण्याकरता नम्रता बागडे उपाध्यक्ष ,,मनीषा भांडारकर विदर्भ कार्याध्यक्ष, सोमना सरोजकर विदर्भ अध्यक्ष, वैशाली रामटेके भंडारा जिल्हाध्यक्ष, सीमा काळे भंडारा जिल्हा कार्याध्यक्ष पूजा पाटील विदर्भ उपाध्यक्ष, संगमित्रा चव्हाण भंडारा जिल्हा उपाध्यक्ष,चरण शहारे, ,पांडुरंग नंदागवळी , , प्रकाश ठवकर, ,विनायक भोयर, दशरथ भोयर ,शामराव बडगे ,देवराम कातोरे, लिलाबाई अंबादे रमेश भोईर रामा टिचकुले, महादेव बडगे ,भाऊराव भोयर, हंसराज अंबादे,सुनंदा टिचकुले, रामकृष्ण वैद्य ,लक्ष्मी वैद्य ,ज्ञानेश्वर टिचकुले प्रफुल सुखदेव ,शरद बडगे ,सोपान ठवकर , मोरेश्वर देऊळकर ,सहादेव टिचकुले ,वनिता ठवकर ,रघुवीर टिचकुले सारू कानतोडे ,श्यामराव कावळे, मारुती वैद्य , मारुती कावळे, मुक्ता सुखदेवे, पार्वता चौधरी ,नीलकंठ टिचकुले ,परमेश्वर टिचकुले ,सुभाष टिचकुले सुधीर सुखदेवे ,गंगा वैद्य ,अशोक टिचकुले ,अस्मिता भोयर ,प्रल्हाद सुखदेवे ,भोलाराम ठवकर, सुरेश बडगे , राजकुमार मेश्राम, गुरुदेव कातोरे, आसाराम बावनकर, भधु शेलोकर किशोर फळे भाऊराव देशमुख, मनीषा घोडेस्वार, पुंडलिक उकरे, मूलचंद तीघरे, मूलचंद रिचडे काळुबाई कानतोडे सतीश बावनकर देवराव वंजारी, कवळू धरमशहारे, रंजू रामटेके प्रिया राऊत ,प्रियंका ,कांबळे यांनी सहकार्य केले.
0 Response to "विदर्भवादी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जन आक्रोश आंदोलन संपन्न "
एक टिप्पणी भेजें