-->
अड्याळ येथील तंटामुक्ती समिती अध्यक्षांची मुनीश्वर बोदलकर यांची निवड

अड्याळ येथील तंटामुक्ती समिती अध्यक्षांची मुनीश्वर बोदलकर यांची निवड

"साप्ताहिक जनता की आवाज
 वृत्त संकलन 

  भंडारा :- पवनी तालुक्यातील अड्याळ येथे दिनांक 25ऑगस्ट 2025 ला ग्रामपंचायत अड्याळ येथील सभागृहात ग्रामसभा पार पडली.ग्रामसभेच्या नोटीसावरील विषय सूची नुसार ग्राम सभेत विषय घेण्यात आले, ग्रामसभेचे अध्यक्ष पद गावाचे सरपंच श्री शिवशंकरजी मुंगाटे यांनी भूषवले,ग्रामसभेचे कार्यवृत ग्रामविकास अधिकारी कु. पौर्णिमा जे.साखरे मॅडम यांनी लिहिले, विषय सूची नुसार ग्राम तंटामुक्त समिती अध्यक्षांची  निवड करण्यात आली.अध्यक्ष पदाकरीता तीन अर्ज आलेले होते त्यापैकी एक अर्ज मागे घेण्यात आला.उरलेल्या दोन उमेदवारांपैकी श्री चिंतामण वाघमारे यांना 47 मते मिळाली ,आणि श्री मुनीश्वर मोतीरामजी बोदलकर यांना 60 मते मिळाली,त्यामुळे श्री मुनीश्वर मोतीरामजी बोदलकर यांची ग्राम तंटामुक्त समिती अध्यक्ष म्हणून बहुमताने निवड झाली,श्री मुनीश्वरजी बोदलकर यांनी यापूर्वी ,प्रभारी सरपंच,तसेच माजी ग्राम तंटामुक्त समिती अध्यक्ष म्हणून तीन वर्ष सेवा दिली होती, सदर ग्रामसभेला पंचायत समिती सदस्या  सीमाताई गिरी ,गावाचे उपसरपंच शंकरजी मानापुरे,ग्रामपंचायत सदस्य  देवदासजी नगरे , ग्राम पंचायत सदस्य विपीन टेंभुर्णे, ग्राम पंचायत सदस्य जावेद शेख, ग्राम पंचायत सदस्य आशिक नैतामे,धनंजय मूलकलवार, मयूर कोल्हटकर,विकास टेंभुर्णे,माजी ग्रामपंचायत सदस्य अतुल गभने,मोनू रणदिवे, नितीन वरंटीवार ,माजी ग्राम पंचायत सदस्य मनोह मोहुरले,अमोल उराडे,राहुल खोब्रागडे, कमलेश जाधव,सर्व ग्राम पंचायत सदस्या,सर्व आशा दिदी, ग्रामपंचायत कर्मचारी वृंद, सर्व ग्रामसभा सदस्य यांनी नवनिर्वाचीत अध्यक्षांचे पुष्पहार, पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले, सभेचे अध्यक्ष सरपंच  शिवशंकर मुंगाटे यांनी ग्रामसभेत सर्व उपास्थित ग्रामस्थांचे आभार मानले, आणि ग्राम सभेचे समारोप केले,

0 Response to "अड्याळ येथील तंटामुक्ती समिती अध्यक्षांची मुनीश्वर बोदलकर यांची निवड"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article