-->
ड्रॅगन फ्रूट व खजूर शेतीला विद्यार्थ्यांची भेट

ड्रॅगन फ्रूट व खजूर शेतीला विद्यार्थ्यांची भेट

नरेंद्र मेश्रम
 साप्ताहिक"जनता की आवाज"
 
लाखनी :- ज्ञानेश्वर विद्यालय सालेभाटा येथील ८ वी व ९ वीच्या विद्यार्थ्यांनी  प्रगतिशील शेतकरी अशोक पटले मासलमेटा यांच्या शेताला भेट देऊन ड्रॅगन फ्रूट व खजूर या पिकांची माहिती घेतली. या भेटीदरम्यान अशोक पटले सरांनी विद्यार्थ्यांना ड्रॅगन फ्रूट व खजूर पिकाची लागवड, देखभाल, उत्पादन व विपणन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

या पिकांच्या उच्च घनता लागवडीबद्दलही त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. विद्यार्थ्यांना या फाली

अंतर्गत शैक्षणिक सहलीदरम्यान कृषी शिक्षिका उज्वला चांदेवार यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण शेती पद्धती, पिकांचे पोषणमूल्य व भविष्यातील बाजारपेठ याबाबत प्रेरणादायी माहिती दिली.

च्या फाली अंतर्गत शैक्षणिक उपक्र मामुळे विद्यार्थ्यांमध्ये आधुनिक शेतीविषयी जिज्ञासा व उत्सुकता निर्माण झाली असून, भविष्यात कृषिक्षेत्रात नवनवीन प्रयोग करण्याची प्रेरणा मिळाली अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक वाल दे यांनी दिली.

0 Response to "ड्रॅगन फ्रूट व खजूर शेतीला विद्यार्थ्यांची भेट"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article