गणेशोत्सवाच्या नावाखाली मंडळात चालतोय जुगार.! गणेश मंडळ आहे की जुगाअड्ड् ?
शनिवार, 30 अगस्त 2025
Comment
सोनू संजीव क्षेत्रे
"साप्ताहिक जनता की आवाज"
मुबंई/पालघर :- जुगार खेळण्यावर पोलीसांनी बंदी घालूनही जागराणाच्या नावाखाली अनेक मंडळात जुगार खेळला जात आहे.अनेकांचे संसार उघड्यावर ही येतात कारवाई होईल याची काहीच भीती सुध्दा उरलेली नाही अनेक गणेश मंडळातील अध्यक्ष व कार्यकर्ते यामधे शमील असतात.
मात्र सध्या सुरु असलेल्या गणेशोत्सवाचा आसरा काही जुगारी घेत आहेत. गणेशोत्सव मंडळामध्ये जागरणाच्या नावाखाली रात्रभर जुगार खेळला जात आहे. त्याठिकाणी रातोरात लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. दिवसा खुर्ची उचलायलाही कार्यकर्ता नसलेल्या अशा काही मंडळात रात्री मात्र जुगारासाठी गर्दी जमलेली असते. त्यामुळे अशा काही गणेशोत्सव मंडळांना जुगार अड्याचे स्वरुप आले आहे..
सार्वजनिक गणेश उत्सवाच्या नावाखाली गणेश मंडळ आता सट्टेबाजी-जुगार करून पैसे लुटतात आणि मग त्याच पैशांची मूर्ती, डेकोरेशन, DJ मध्ये उधळपट्टी करतात. गणेशोत्सव हा श्रद्धेचा उत्सव असून पैसे कमावण्याचा मार्ग झाला आहे. आणि दारू पिऊन देवाच्या मिरवणुकीत नाचणे म्हणजे टॉप लेवल चा मुर्खपणा
तरी शहरातील अशा इतरही काही मंडळांमध्ये रात्रीच्या वेळी जागरणाच्या नावाखाली जुगाराचे डाव मांडले जात आहेत. त्यामुळे प्रबोधनाचा वारसा असलेल्या गणेशोत्सवाला गालबोट लागत आहे.
0 Response to "गणेशोत्सवाच्या नावाखाली मंडळात चालतोय जुगार.! गणेश मंडळ आहे की जुगाअड्ड् ? "
एक टिप्पणी भेजें