-->

Happy Diwali

Happy Diwali
आंबाडी चे डॉ.अक्षय साठवणे वेदाचार्य गौरवगाथा  पुरस्काराणे सन्मानीत.

आंबाडी चे डॉ.अक्षय साठवणे वेदाचार्य गौरवगाथा पुरस्काराणे सन्मानीत.

नरेंद्र मेश्राम 
"साप्ताहिक की आवाज" 
                  
 भंडारा :- सध्याच्या युगात एल्यूप्याथी उपचार रुग्णाला सहज बरा करणारा असला तरी खर्चिक पण  खुप काळ टिकणारे उपचार वाटत नाही.सतत औषधी घ्यावी लागल्याने मोठा आर्थिक नुकसान होतांना दिसतो. आयुर्वेदिक उपचारा ने काही आजार समुळ नष्ट होतानी दिसतात पण त्या उपचार प्रक्रियेला वेळ लागत असल्याने  लोक त्याकडे पाठ फिरवितात. भारत भूमी ही आयुर्वेदाणे नटलेली असून वेद पुरानात सुद्धा आयुर्वेदिक उपचाराची पद्धत ग्रामीण भागात आजही कारगर आहे. म्हणुन नुकताच नागपूर येथे आयोजित प्रभावशाली  आयुर्वेदा चार्य गौरवगाथा पुरस्कार सोहळा विदर्भातील वैद्यकीय क्षेत्रात नाविण्यापुर्ण कार्य करणारे वैद्यकीय तज्ञानचा सत्कार समारंभ सोहळा केंद्रीय मंत्री नितीन जी गडकरी, बैद्यनाथ आयुर्वेद भवन  प्रा. लिमिटेड चे व्यवस्थापकीय संचालक  सुरेश शर्मा व बैद्यनाथ आयुर्वेद प्रा. लिमिटेड चे अध्यक्ष सिद्धेश शर्मा यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला त्यात भंडारा नजिकच्या आंबाडी येथील दीर्घायुष्य क्लिनिकल चे डॉ. अक्षय अनोद साठवणे यांचा  सत्कार करण्यात आला.                      
डॉ. अक्षय साठवणे यांच्या मते आयुर्वेदाचे रोग मुक्ती साठी योगदान महत्त्वाचे आहे.
आयुर्वेद ही एक जीवनपद्धती आहे,  रोजच्या जीवनात आपण जे खातो, पितो, निद्रा घेतो, या संपूर्ण क्रियांमध्ये आयुर्वेदाचे महत्व वसलेले आहे जसे जेवणाची वेळ निघून गेली, की जेवण जात नाही किंवा पित्ताचा त्रास होतो, म्हणजेच पित्तप्रकोप होतो. निद्रा-झोप कमी झाली, तर चिडचिड होते. कामात लक्ष लागत नाही, म्हणजेच वात वाढती अति खाल्ले, की कफ वाढतो,   दैनंदिन जीवनात  चूक झाली, की त्रास होतो, हे सगळे टाळण्यासाठी आयुर्वेदाचे फार महत्त्वाचे योगदान आहे.
आयुर्वेदाकडे कल
गेल्या काही वर्षात अनेक नागरिक उपचारासाठी आयुर्वेदाचा पर्याय स्वीकारत आहेत.
दुर्धर व्याधींवर उपचार
आयुर्वेदात अनेक दुर्धर व्याधींवर उपचार आहेत. 
आयुर्वेदातील उपचारपद्धती
 साठवणे यांच्या दवाखान्यात प्रामुख्याने पंचकर्म, अग्निकर्म, विद्धकर्म केले जाते. यामध्ये पंचकर्माचा व्याधीनुरूप वापर केला जातो. उदाहरणार्थ, वातविकारासाठी बस्ती चिकित्सा, पित्तविकारासाठी विरेचन आणि कफविकारासाठी वमन करवतात. संधिगत रोगावर जानूबस्ती, कटिबस्ती, श्शुलनिर्हणासाठी अग्नी व विद्धकमधि प्रयोग आणि अभ्यंतर सेवनासाठी पोटात औषधींचा वापर केला जातो.

आयुर्वेदात रोगप्रतिबंधात्मक शक्ती स्वस्थस्य स्वास्थ्यत्क्षण आतुरस्य विकाराशमन च' या स्लोकात सगळे सामावलेले आहे. व्याधीची चिकित्सा तर करायचीच; पण ती व्याधी होऊ नये यासाठी उपाययोजना करावी, हे आयुर्वेदशास्त्र सांगते. जर दोष बालू मलक्रिया सम प्रमाणात असेल, तर विकार होणे अवघड आहे. त्यामुळेच रोगप्रतिबंधात्मक शक्ती विकसित होते."त्यामुळेच आयुर्वेदिक वैद्यक व्यावसायिकांना जगभरात मोठी मागणी आहे, 
व्याधीची चिकित्सा तर करायचीच, पण ती व्याधी होऊ नये यासाठी उपाययोजना करायची हे आयुर्वेदशास्त्र  सागते. जर दोष धातु, मलक्रिया समप्रमाणात असेल, तर विकार होने  अवघड आहे. त्यामुळेच एक प्रकारे रोगप्रतिबंधात्मक शक्ती विकसित होते, त्यामुळे आयुर्वेदिक उपचारासाठी मोठया प्रमाणात रुग्ण वाढत असल्याचे मत डॉ. अक्षय अनोद साठवणे यांनी व्यक्त केला आहे.

0 Response to "आंबाडी चे डॉ.अक्षय साठवणे वेदाचार्य गौरवगाथा पुरस्काराणे सन्मानीत."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article