-->
बुध्द विहारात फडकला स्वातंत्र्याचा  तिरंगा

बुध्द विहारात फडकला स्वातंत्र्याचा तिरंगा

• राज्य शिव छत्रपती माणवी सुरक्षा फाउंडेशन व संत गाडगेबाबा अनाथालया तर्फे वृक्षारोपण.
 
  लाखनी := तालुक्यालगत असलेल्या बोधीचेतीय संस्था चिखली , हमेशा एम.आय. डी.सी. राजेगाव  येथील बुध्द विहार परीसरात दिं. १५ आगस्ट २०२५ ला   स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण करुन  मानवंदना देण्यात आली , राजे  शिव छत्रपती माणवी सुरक्षा फाउंडेशन व संत गाडगेबाबा अनाथालया तर्फे नैसर्गिक पर्यावरण संगोपन मानव कल्याण कार्य व उपक्रमा  अंतर्गत सामाजिक वनीकरण विभाग भंडारा यांच्या सौजन्याने परिसरात अनेक ठिकाणी विविध प्रकारचे वृक्ष रोपेटे लावुन वृक्षारोपण करण्यात   आले आहे.

यादरम्यान संस्थेचे अध्यक्ष पुज्य भंदतं  डॉ.धम्मदिप महाथेरो यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले संस्थापक व जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिलीप बडोले , यांचे प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला ह्यावेळी भिम आर्मी चे  कार्यकर्ते संतोष उकनकर , जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा.युवराज खोब्रागडे , सेवानिवृत्त मेजर राजेंद्र केळकर  , भारत सरकारचे  सेवानिवृत्त  भूवैज्ञानिक  सहा.खनिज शास्त्रज्ञ रामानंद बोदेले    ,  डॉ बाबासाहेब आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिपक जनबंधू ,दिनदयाल गोस्वामी ,नितेश टेंभुर्णी ,  प्रा.विजय रंगारी  ,सोपान नंदेश्वर , विनोद जांभुळकर , अभय बडोले , अनुबाई गेडाम , अनिता जनबंधू , अर्चना गेडाम ,  ज्योती जांभुळकर ह्या संपूर्ण उपस्थित पाहुण्यांनी  बौध्द विहार आणि परिसरातील विकास साधन्याहेतू सविस्तर मार्गदर्शन करुन ह्या पर्यटन  स्थळाचे विकास होने काळाची गरज असल्याचे मत मांडले  , स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली हे विशेष.

0 Response to "बुध्द विहारात फडकला स्वातंत्र्याचा तिरंगा "

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article