भंडाराच्या राज्य परिवहन विभागीय कार्यालयाकडून चालकांचा सत्कार
सोमवार, 18 अगस्त 2025
Comment
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- राज्य परिवहन विभागाच्या लाल परी म्हणुन चालणाऱ्या बसेसचे अपघात टाळण्याच्या चालकांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने २५ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी विनाअपघात सेवा करणाऱ्या चालकांनां रोख बक्षीस प्रदान करून सपत्नीक सत्कार रा. प. विभागीय कार्यालय भंडाराच्या वतीने सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले .
या विनाअपघात सेवा करणाऱ्या चालकांना रोख बक्षीस व सपत्नीक सत्कार योजनेअंतर्गत अरविंद शहारे चालक, भंडारा आगार व अरुण कल्लिकर चालक, साकोली आगार यांचा रु. २५,०००/_ रोख व सन्मानपत्र, प्रदान करुन २५ वर्ष विना अपघात सेवेचा बिल्ला,स्मुर्तीचिन्ह, गौरवपात्र चालकांच्या पत्नीस साडी व खण देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी रा. प. कामगार कल्याण समितीकडून प्रियांशी प्रकाश मेश्राम व प्रियंका किशोर तिजारे या गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा रा. प. कर्मचाऱ्यांच्या पाल्यांचा बक्षीस व पदक देऊन गौरव करण्यात आले .
या कार्यक्रमाचे उदघाटन प्रादेशिक व्यवस्थापक, नागपूर प्रदेश श्रीकांत गभणे यांचे हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तनुजा अहिरकर, विभाग नियंत्रक ह्या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. गोपाल व्यास, डॉ. दुर्गेश चोले उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन भारती सांगोडे यांनी केले. तर प्रास्ताविक व आभार प्रदर्शन कामगार अधिकारी पराग शंभरकर यांनी केले. यावेळी यंत्र अभियंता,संदीप खवडे, वाहतूक अधिकारी,शीतल शिरसाठ, सुरक्षा व दक्षता अधिकारी,मोहन कानफाडे, सांख्यिकी अधिकारी,राकेश तलमले, विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी, उल्हास घुई,, विभागीय वाहतूक अधीक्षक,प्रवीण गोल्हर, स्थापत्य अभियंता सतीश कटरे, सहाय्यक यांत्रिक ईश्वर धुर्वे, अभियंता, लेखा अधिकारी अमोल उईके व पर्यवेक्षक तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Response to "भंडाराच्या राज्य परिवहन विभागीय कार्यालयाकडून चालकांचा सत्कार"
एक टिप्पणी भेजें