स्वतःच्या आयुष्याची नवे स्वप्न बघणारी आजची पिढी - आ. नाना पटोले
सोमवार, 18 अगस्त 2025
Comment
• साकोली जिल्हा परिषद शाळेत नव्या वर्गखोलीचे लोकार्पण व भूमिपूजन सोहळा संपन्न
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- आपण शालेय जीवनात शिकत असतांना आपण समोरच्याकडे बघून लवकर मोठे व्हावे असे वाटते. आणि मोठे झाल्यावर लहान निरागस मुलांकडे बघून लहान व्हावे असेही वाटते. "लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा". माझ्या बाल मित्रांनो, विद्यार्थ्यांचा लहानपणाचा काळ आणि वेळ खऱ्या अर्थाने महत्त्वाची असते. लहानपणीचे शिक्षणच खऱ्या अर्थाने देशाचे सुजान नागरिक घडविण्यात मदत करीत असते. शिक्षण घेऊन सेवेसाठी निघायचे ही मानसिकता विद्यार्थ्यांनी अंतर्मनातून ठेवून बाहेर पडायचे असते. आणि आज स्वतःच्या आयुष्याची नवे स्वप्न बघणारी ही पिढी आहे असे प्रतिपादन आमदार नाना पटोले यांनी केले. ते ( गुरू. १४ ऑगस्ट ) ला जिल्हा परिषद केंद्र उच्च प्राथ. शाळा क्र. १ गणेश वार्ड येथील नव्या वर्गखोलीचे लोकार्पण व भूमिपूजन समारंभात बोलत होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणात आ. पटोले पुढे म्हणाले की, कॉन्व्हेंट दर्जाचे शिक्षण जि. प. शाळेत मिळाले पाहिजे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर भर देणे हे शिक्षकांचे जसे कर्तव्य आहे तसेच आपल्या पाल्यांनी अभ्यास केला की नाही हे पालकांनीसुद्धा लक्षात ठेवणे आजच्या काळाची गरज आहे. हे स्पर्धेचे युग आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये गोरगरिबांच्या मुलांची लेकरे शिकतात. आपल्या जिल्हा परिषद शाळांमधील अधिकाअधिक विद्यार्थी नवोदय परीक्षेत उतरले पाहिजेत ही शिक्षकांची जबाबदारी आहे. साकोली येथे गणेश वार्ड जिल्हा परिषद वरिष्ठ केंद्रीय प्राथमिक शाळा क्र. १ येथे आयोजित करण्यात आलेल्या वर्ग खोल्यांचा लोकार्पण सोहळा आणि ४ नव्या वर्ग खोल्यांच्या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षस्थानी आमदार नाना पटोले, उद्घाटक माजी आमदार डॉ. हेमकृष्ण कापगते प्रमुख अतिथी भंडारा जि. प. शिक्षण सभापती नरेश ईश्वरकर, भंडारा जि. प. सभापती शितल राऊत, माजी सभापती मदन रामटेके, पं. स. सभापती डॉ. ललित हेमने, उपसभापती करूणख वालोदे, डॉ. अशोक कापगते, अँड. दिलीप कातोरे, डॉ. नरेश कापगते , माजी नगरसेवक अँड. मनीष कापगते, पिंडकेपार सरपंच नंदू समरीत, साकोली पं. स. गटशिक्षणधिकारी विजय आदमने, शिक्षण विस्तार अधिकारी हरीश भलावी, अश्विन नशिने, समाजसेवक प्रवीण भांडारकर, विवेक बैरागी, रंजना मस्के, से. नि. शिक्षक बि. के. फुलबांधे, आकाश बोथरा नागपूर, भव्य पांडे नागपूर, चंद्रकांत वडीचार, किशोर बावणे, बलविर राऊत, केंद्रप्रमुख अर्जुन मेश्राम व स्थानिक शाळा व्यवस्थापन समितीचे संपूर्ण पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
भूमिपूजन आणि वर्ग खोल्यांचे लोकार्पण सोहळ्यानंतर विद्यार्थ्यांनी वर्षभर राबविलेल्या उपक्रमशील कलादालनाचे नाना पटोले यांनी निरीक्षण करून विद्यार्थी आणि शिक्षक आणि शिक्षकांचे भरभरून कौतुक केले. याप्रसंगी शाळेसाठी महत्त्वाचे योगदान देणाऱ्या सर्व दात्यांचा नानाभाऊ यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तर सन २०१८ पासून शालेय पटसंख्येत वेळोवेळी वाढ करून शाळेला भरारी मारून देणारे मुख्याध्यापक डी. डी. वलथरे, नाविन्यपूर्ण उपक्राचे सहाय्यक शिक्षिका शालिनी राऊत, "उड्डाण दस साल के बाद" या उपक्रमाचे पदवीधर शिक्षक चेतन बोरकर, चौफेर उपक्रमात महत्त्वपूर्ण योगदान देणारे मोरेश्वर बोकडे, टि. आय. पटले, चित्ररेखा इंगळे, श्रद्धा औटी, भुमेश्वरी गुप्ता, आरती कापगते यांचाही शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. येथील शाळेच्या विकासाला गती देणारे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हेमंत भारद्वाज, उपाध्यक्ष हिमा राऊत, सदस्य पत्रकार आशिष चेडगे, सदस्य शिशुपाल क-हाडे, भागवत लांजेवार, पुनम मेश्राम, दिलीप झोडे, वैशाली कापगते दिपाली राऊत, रिता शहारे यांचाही गौरव करण्यात आला.
या निमित्ताने प्रास्ताविक करतांना मुख्याध्यापक डी.डी. वलथरे यांनी सन २०१८ पासून ते आतापर्यंतचा शाळेचा उत्तरोत्तर प्रगतीचा गोषवारा मांडला. आतापर्यंत शाळेच्या चौफेर विकासाला ज्यांनी अमूल्य योगदान दिले त्यांचा मुख्याध्यापक या नात्यांनी विशेष उल्लेख केला. अशाप्रकारे याहीपुढे सर्वांचे योगदान मिळेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शालिनी राऊत, तुलसीदास पटले तर आभार प्रदर्शन चेतन बोरकर यांनी मानले. यासाठी मदतनीस रेषमा कोवे कविता बावणे छन्नू मडावी यांनी विशेष योगदान दिले.
0 Response to "स्वतःच्या आयुष्याची नवे स्वप्न बघणारी आजची पिढी - आ. नाना पटोले "
एक टिप्पणी भेजें