• मुख्याधिकारी नगर परिषद यांनी आदेश काढून लावला फलक
गुरुवार, 21 अगस्त 2025
Comment
भंडारा स्मशान भूमीत बौद्ध धर्मीयांना अंत्यसंस्कार करण्यास मनाई
• बौद्ध धर्मीय विविध धार्मिक व सामाजिक संघटनेनी जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- भारत हे एक धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य राष्ट्र आहे .भारतीय राज्यघटनेच्या कलम 25 ते 28 नुसार प्रत्येक भारतीयांना त्यांचे धार्मिक, उपासना व आचरण करण्याचे स्वातंत्र्य आहे .त्यानुसार शासनाने प्रत्येक शहरात व गावात त्यांच्या नागरिकांच्या अंत्यसंस्कारा करिता सार्वजनिक स्मशानभूमी निर्माण केल्या आहेत व या स्मशानभूमीची देखरेख व सुव्यवस्था करण्याची जबाबदारी स्थानिक नगर परिषद /ग्रामपंचायत यांच्याकडे सोपीली आहे .या दोन्ही संस्थांना त्यांच्या शहरातील/ गावातील नागरिकांच्या /लोकांच्या जन्म मत्यूची नोंद ठेवतच मृत्यूनंतर त्यांच्या अंत्यविधी व अंत्यसंस्काराची व्यवस्था करण्याचे कर्तव्य पार पाडावे लागते.
परंतु नगरपरिषद भंडाऱ्याचे मुख्याधिकारी यांनी त्यावर मात करून व आपले कर्तव्य विसरून 'भंडारा स्मशानभूमीत हिंदू धर्मीयाव्यतिरिक्त इतर धर्मीयांचा अंत्यविधी होणार नाही याची नोंद घ्यावी 'अशा प्रकारचा फलक स्मशानभूमीत लावलेला आहे. त्यामुळे या वादग्रस् फलकामुळे बौद्ध धर्मीयांना स्मशानभूमीच नाही असे म्हणण्याची वेळ आली आहे. एवढेच नव्हे तर बौद्ध धर्मियांनी त्यांच्या घरातील पार्थिवाची विल्हेवाट सार्वजनिक रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी करावी काय ? हा ज्वलंत प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत नगरपरिषदेच्या त्या बेकायदेशीर फलकामुळे हिंदू आणि बौद्ध धर्मीयात वर्षानुवर्षे या स्मशानभूमीत होत असलेल्या अंत्यसंस्कारावरून तेढ निर्माण होऊन सामाजिक शांतता व सलोख्याला तडा जाऊ शकतो
म्हणून वर्तमान गंभीर परिस्थितीचा विचार करून स्मशानभूमीत लावलेला व दोन धर्मीयात तेढ निर्माण करणारा फलक त्वरित काढण्याचे निर्देश जिल्हाधिकारी महोदय यांनी मुख्याधिकारी नगरपरिषद यांना देण्यात यावे. व त्यांना या बेकायदेशीर कृत्याबद्दल समजल द्यावी
अशा मागणीचे निवेदन बौद्ध धर्मीय विविध धार्मिक व सामाजिक संघटनेच्या वतीने दिनांक 20 ऑगस्ट 2025 ला 5 वाजत देण्यात आले आहे. शिष्टमंडळात अमृत बन्सोड ,मन्साराम दहिवले, महेंद्र गडकरी, महादेव मेश्राम ,परमानंद मेश्राम, मोरेश्वर गेडाम, गुलशन गजभिये आहूजा डोंगरे, भावेश कोटांगले, कार्तिक मेश्राम, चंद्रशेखर खोब्रागडे ,सचिन गेडाम ,कपिला रामटेके, अरविंद काणेकर ,आर. आर . बन्सोड धर्मेंद्र,गोसावी इत्यादींच्या समावेश होता.
0 Response to "• मुख्याधिकारी नगर परिषद यांनी आदेश काढून लावला फलक"
एक टिप्पणी भेजें