लाखांदूर येथे जनता दरबाराचे आयोजन• प्रत्यक्ष 21 प्रकरणे निकाली
सोमवार, 8 सितंबर 2025
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्त प्रतिनिधी
भंडारा: - भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री पंकजजी भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशानुसार दिनांक 08/09/2025 रोजी सकाळी 10. 00 ते दुपारी 1.00 या वेळेत लाखांदूर तालुक्यातील तहसील कार्यालयात जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. या दरबाराचे मुख्य उद्दिष्ट नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांचे तातडीने निराकरण करणे हे होते. सदर जनता दरबारला तहसीलदार लाखांदूर *वैभव पवार,* जिल्हा सचिव भाजपा भंडारा *प्रमोद प्रधान,* सरांडी/बु. मंडळ अध्यक्ष *उमेश देशमुख,* उपाध्यक्ष नगरपंचायत लाखांदूर *प्रल्हाद देशमुख,* नायब तहसीलदार *धकाते,* जिल्हा अध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा भाजपा भंडारा *दिनेश वासनिक,* पंचायत समिती सदस्य *मधुर उके,* कृषी विभाग, पंचायत समिती, वनविभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद, नगरपंचायत लाखांदूर येथील अधिकारी उपस्थित होते._
_यावेळी उपस्थित नागरिकांच्या विविध अडचणी, शासकीय योजनांबाबतच्या अडथळ्यांसह स्थानिक प्रश्न याबाबत चर्चा केली. काही तातडीच्या समस्या तत्काळ सोडविण्यात आल्या तर काही प्रश्न संबंधित विभागाकडे मार्गदर्शनासह सोपविण्यात आले. *आज तब्बल 21 प्रकरणे निकाली काढण्यात आले.* जनतेशी थेट संवाद साधण्याची ही उत्तम संधी मिळाली असून अशा उपक्रमांमुळे शासन आणि जनता यांच्यातील नाळ अधिक घट्ट होत आहे._
0 Response to "लाखांदूर येथे जनता दरबाराचे आयोजन• प्रत्यक्ष 21 प्रकरणे निकाली"
एक टिप्पणी भेजें