-->
श्री संताजी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस आणि शिक्षक दिन संपन्न

श्री संताजी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस आणि शिक्षक दिन संपन्न

 नरेंद्र मेश्राम 
"सापताहीक जनता की आवाज"
 
पालांदूर :- स्थानिक :-श्री संताजी कला व विज्ञान महाविद्यालय पालांदूर येथे राष्ट्रीय सेवा योजना आणि सांस्कृतिक  विभागाच्या वतीने "आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस "आणि शिक्षक दिन साजरा करण्यात आला ,या दिवसाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. जी आर लांजेवार, प्रभारी प्राचार्य प्रमुख वक्ते म्हणून प्रा.डाॅ संजयकुमार निंबेकर, प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ. रमेश बागडे ,डॉ. राजेंद्र खंडाईत,प्रा.प्रमोद शेंडे , डॉ नितीन थुल,प्रा.संगिता सेलोकर प्रा रोहिणी कोरे.उपस्थित होते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व आणि आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवसाचे स्थान तसेच शिक्षक दिनाचे महत्त्व त्या निमित्ताने कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रमेश बागडे  केले .साक्षरतेचे महत्व आणि संपूर्ण देशातील साक्षरतेचे प्रमाण या विषयावर सविस्तर भाष्य प्रा. डॉ संजयकुमार निंबेकर यांनी व्यक्त केले .तर साक्षरतेची असणारी आजची स्थिती या विषयावर डॉ. राजेंद्र खंडाईत यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्ष भाषणातून डॉ. गिरीश लांजेवार यांनी साक्षरतेची आजची स्थिती त्या अनुषंगाने युवकांचे कार्य या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे औचित्य साधून आंतरराष्ट्रीय साक्षरता रॅली महाविद्यालय  परिसर आणि कवडसी या गावातून काढण्यात आली. तसेच राष्ट्रीय सेवा योजना भंडारा जिल्हा समन्वयक म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल डॉ संजयकुमार निंबेकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सर्व शिक्षकांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन,प्रा मनोज मोहतुरे यांनी केले तर आभार प्रदर्शन ,प्रा.प्रमोद शेंडे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता, श्रीकृष्ण बेंदवार,अनिकेत ठवरे निकिता कोडापे, लक्ष्मी भानारकर , या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

0 Response to "श्री संताजी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस आणि शिक्षक दिन संपन्न"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article