मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न
सोमवार, 8 सितंबर 2025
Comment
• माझा गांव हा माझा परिवार समजून काम केले तर आपल्या गावाचा विकास कोणी थांबवू सकत नाही आणि
त्यातूनच आपल्या गावाचा नाव तालुक्यातच नव्हे, जिल्ह्यात ,राज्यातच तर
देशात सुद्धा नावलौकिक करू सकतो -- आमदार राजू कारेमोरे.
दिगंबर देशभ्रतार
"सापताहीक जनता की आवाज"
भंडारा :- आज दिनांक ८ सप्टेंबर 2025 रोज सोमवार ला हेमंत सेलिब्रेशन भंडारा येथे जिल्हा परिषद भंडारा च्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून
*कार्यक्रमाचे उद्घाटक:- मा.श्री.राजू माणिकरावजी कारेमोरे* आमदार तुमसर मोहाड़ी विधानसभा क्षेत्र यांच्या शुभहस्ते दिप प्रज्वलित करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
प्रमुख उपस्थिती :-
मा.श्री.मिलिंदकुमार साळवी मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.भंडारा
मा.श्री.विवेक बोंदरे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी जि.प.भंडारा
मा.श्री.उमेश नंदागवळी उपमुख्यकार्यकारी अधिकारी जि.प.भंडारा
प्रमुख पाहुणे:-
श्री.यशवंत सोनकुसरे जि.प.सदस्य भंडारा,
श्री.महादेव पचघेरे जि.प.सदस्य भंडारा,
श्री.दिलीप सार्वे जि.प.सदस्य भंडारा,
श्री. राजेंद्र ढबाले जि.प.सदस्य भंडारा,
श्री. मोहनभाई पंचभाई जि.प.सदस्य भंडारा, तसेच सर्व जिल्हा परिषद सदस्य भंडारा, सर्व पंचायत समिती सभापती, उपसभापती,सदस्य, तसेच सर्व सरपंच महोदय,व ग्रामविकास अधिकारी व तसेच विविध विभागातील अधिकारी कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.त्यावेळी आमदार राजू कारेमोरे यांनी मार्गदर्शन करते वेळी सांगितले की, शासनाने हा उपक्रम राबविण्या मागचा उद्देश्य एक ग्रामीण भागाला समृद्ध करणे त्या करीता अगोदर आपल्याला ग्रामीण भागातील शेतीला मजबूत करावे लागेल आणि त्यातूनच आपण देशाची आर्थिक परिस्थिति मजबूत करू सकतो.म्हणून सर्वानी एकत्र येऊन आपला गांव समृद्ध करण्याकरीता सहकार्य करण्याची गरज आहे.
0 Response to "मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न "
एक टिप्पणी भेजें