तुमसर शहरातील मुख्य मार्गांवर रस्त्याच्या मधोमध मोकाट जनावरे बसत असल्यामुळे वाहतुकीची समस्या
बुधवार, 3 सितंबर 2025
Comment
• प्रशासन अपघात घडण्याची वाट पाहते का? जनतेच्या प्रश्न!.
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्त प्रतिनिधी
तुमसर :- तुमसर शहरात मागील अनेक दिवसांपासून जुना बस स्टॅन्ड, दुर्गा मंदिर चौक, मुख्य बस स्टॅन्ड अशा विविध ठिकाणच्या मुख्य मार्गांवर मोकाट जनावरंच्या वावर पाहायला मिळत आहे जनावरे रस्त्याच्या मधोमध बसत असल्यामुळे वाहतुकीची समस्या तर होतेच शिवाय अपघात सुद्धा घडण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. मागील काही घटना पाहता देव्हाडी रोड येथे मोकाट जनावर मुळे एका निरापराध व्यक्तीला आपल्या प्राणाशी मुकावे लागले होते तरी सुद्धा प्रशासनाला जाग येत नाही का? हाच मोठं प्रश्न येथे उदभवतो.
प्रशासनाणी लवकरात लवकर मोकाट जनावरंच्या बंदोबस्त करावे अशी मागणी आता नागरिक करित आहे. अन्यथा मोकाट जनावरे प्रशासन यांच्या दारीं आणून सोडू असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
0 Response to "तुमसर शहरातील मुख्य मार्गांवर रस्त्याच्या मधोमध मोकाट जनावरे बसत असल्यामुळे वाहतुकीची समस्या"
एक टिप्पणी भेजें