भटके बेवारस कुत्र्यांच्या भंडारा वाशी यांना त्रास नगरपरिषद प्रशासनाची दुर्लक्ष.
बुधवार, 3 सितंबर 2025
Comment
नरेन्द्र मेश्राम
"सापताहीक जनता की आवाज"
भंडारा: - भंडारा शहरात भटक्या बेवारस कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे शालेय मुले, महिला, वयोवृद्ध तसेच सामान्य नागरिकांना दररोज सुरक्षिततेचा धोका निर्माण होत आहे. काही कुत्रे आक्रमक व धोकादायक स्वरूपाचे असल्याने चावणाऱ्या कुत्र्याच्या घटनाही घडत आहेत. सुप्रीम कोर्टाने Animal Welfare Board of India V. People for Elimination of stray Troubles(2015) प्रकरणात स्पष्ट आदेश दिला आहे की, No stray Dog shall be Culled or Killed Municipal authorities are duty bound to conduct Animal Birth Control ,(ABC) Programme ,which includes sterilization and Vaccination against rabies in accordance with the Animal Birth Control (Dog)Rules, 2001" तसेच सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले आहे की, स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी आहे की, नागरिकांचे व प्राण्यांचे संरक्षण करताना योग्य समतोल साधावा या अनुषंगाने आपण नगर परिषदे अंतर्गत तातडीने कारवाई करावी, अशी मागणी भंडारा जिल्हाध्यक्ष (R.P.I.A) श्री. भीमरावजी टेंभुर्ने तसेच आरपीआयचे संपूर्ण पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी आणि नगरपरिषद सीओ कार्यालय भंडारा येथे करण्यात आली आहे .
0 Response to " भटके बेवारस कुत्र्यांच्या भंडारा वाशी यांना त्रास नगरपरिषद प्रशासनाची दुर्लक्ष. "
एक टिप्पणी भेजें