बापूसाहेब लाखनीकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था लाखनी येथे प्रवेश आनंदोत्सव कार्यक्रम साजरा.
मंगलवार, 2 सितंबर 2025
Comment
नरेंद्र मेश्राम
"सापताहीक जनता की आवाज"
लाखनी :- बापूसाहेब लाखनीकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था लाखनी येथे संस्थेच्या प्राचार्या सौ . जे .व्ही . निंबार्ते मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेमध्ये प्रवेश आनंदोत्सव कार्यक्रमाचे आयोजन केले .कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून प्रा. डॉ. नितीन नवखरे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे गटनिदेशक श्री. प्रशांत बेतावार उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून पोलीस स्टेशन कार्यालय लाखनी येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री .राजू साळवे आणि प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे आयएमसी सदस्य श्री .अर्पित गुप्ता, निदेशक दिगंबर उरकुडे, निदेशक राजू भुरे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात ही महाराष्ट्र राज्य गीत जय जय महाराष्ट्र माझा या गीताने झाली. कार्यक्रमाचे उद्घाटक श्री .नितीनजी नवखरे यांनी प्रशिक्षणार्थ्यांना व्यक्तिमत्व विकास ,ध्येय निश्चिती, आणि व्यावसायिक प्रशिक्षणाविषयीची माहिती दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री राजूजी साळवे यांनी प्रशिक्षणार्थ्यांना सायबर क्राईम आणि नशा मुक्त अभियान याविषयीची माहिती दिली . संस्थेचे आयएमसी सदस्य अर्पित गुप्ता यांनी प्रशिक्षणार्थ्यांना सध्याच्या शिक्षण प्रणाली विषयक माहिती दिली आणि प्रशिक्षणार्थ्यांना उज्वल आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या .कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री प्रशांत बेतावार यांनी प्रशिक्षणार्थ्यांना संस्थेची ओळख आणि व्यवसाय विषयक माहिती सांगितली .प्रवेश घेतलेल्या नवीन प्रशिक्षणार्थ्यांना भेटवस्तू आणि गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन , प्रास्ताविक भाषण आणि आभार प्रदर्शन चक्रधर पाखमोडे यांनी केले . या कार्यक्रमासोबतच पालक सभेचे आयोजन करण्यात आले. संस्थेमध्ये बहुसंख्येने पालक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. दिगंबर उरकुडे ,श्री राजू भुरे ,श्री शुभम सरकाटे ,श्री शुभम व्यवहारे , श्री .महेश शिंदे ,श्री. नागेश बहिरे ,श्री .मोहन रहाटे, श्री हेमंत पिल्लेवान ,श्री .नितेश सतदेवे ,श्री प्रशांत वैद्य ,सौ. ईश्वरी भिवगडे, सौ .सीमा सतदेवे ,सौ . पद्मा भूते, जयश्री मासुरकर , श्री . राहुल पवार यांनी सहकार्य केले
0 Response to "बापूसाहेब लाखनीकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था लाखनी येथे प्रवेश आनंदोत्सव कार्यक्रम साजरा."
एक टिप्पणी भेजें