श्री सोमवंशी क्षत्रिय समाज उल्हासनगरतर्फे गणेशोत्सवात महिलांसाठी “खेळ पैठणी” कार्यक्रम
शुक्रवार, 5 सितंबर 2025
Comment
सोनू क्षेत्र
"सापताहीक की आवाज"
उल्हासनगर :- श्री सोमवंशी क्षत्रिय समाज, उल्हासनगरतर्फे गणेशोत्सवाच्या निमित्ताने महिलांसाठी “खेळ पैठणी” या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात उल्हासनगरमधील क्षत्रिय समाजातील सुमारे ८० ते १०० महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
महिलांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. खुर्ची रेस, रिंग टाकणे, बास्केट बॉल, संगीतमय खुर्ची तसेच रांगोळी स्पर्धेमुळे कार्यक्रमाला रंगत आली. विशेषतः खेळ पैठणी हा खेळ घेण्यासाठी कल्याण येथील उज्ज्वला पवार मॅडम विशेष उपस्थित राहिल्या.
या स्पर्धेतून एकूण चार विजेत्या महिलांची निवड करण्यात आली.
विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे :
प्रथम क्रमांक – ज्योती विठ्ठल बारड
द्वितीय क्रमांक – अनिता सचिन गांगजी
तृतीय क्रमांक – रुपाली संदीप बिचवे
चतुर्थ क्रमांक – प्रिया फुलचंद आरसिध
विजेत्या महिलांना पैठणी भेट देऊन सन्मानित करण्यात आले.
सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत पार पडलेल्या या कार्यक्रमात क्षत्रिय समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. लक्ष्मी रमेश बसुदे यांनी प्रमुख पाहुण्या उज्ज्वला पवार मॅडम यांचा सत्कार केला.
महिलांनी कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत अशा उपक्रमांचे आयोजन सातत्याने व्हावे, ज्यामुळे महिलांना मन मोकळे करण्याची संधी मिळते तसेच जिंकण्याची जिद्द निर्माण होते, असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समाजातील आकाश दीपक मेंगजी यांनी विशेष सहकार्य केले.
0 Response to "श्री सोमवंशी क्षत्रिय समाज उल्हासनगरतर्फे गणेशोत्सवात महिलांसाठी “खेळ पैठणी” कार्यक्रम"
एक टिप्पणी भेजें