तुमसर भंडारा राष्ट्रीय महामार्ग च्या दुरुस्ती करिता चक्क खासदार डॉ.पडोळे उतरले रस्त्यावर .
सोमवार, 8 सितंबर 2025
Comment
• स्वतः पावडा हातात घेत बुजविले खड्डे
• अधिकारीना धरले धारेवर
दिगंबर देशभ्रतार
"साप्ताहिक जनता की आवाज"
तुमसर :- तुमसर- भंडारा राष्ट्रीय महामार्ग हा इतक्या वाईट स्थितीत आहे की इथून प्रवास करणे खूप कसर तीचे काम झाले आहे. अनेक अपघात इथे नित्याचेच झालेले आहेत. या संबधी खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी अनेकदा केंद्र सरकार, राज्य सरकार व संबंधित विभागाचे अधिकारी यांना वारंवार पत्र व्यवहार व मौखिक चर्चा करून अवगत केले पण तरी देखील शासन प्रशासन यांना जाग न आल्यामुळे चक्क खासदार महोदय यांनीच पावडा हातात घेत रस्तावर उतरून खड्डे बुजवायला सुरुवात करून प्रशासनाला जागे केले. नागरिकांच्या तीव्र भावना लक्षात घेत खासदार यांनी उचलले पाऊल पाहून नागरिकांना काही का होईना या पडलेल्या खड्यापासून दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त होताना दिसत आहे. डॉ. पडोळे यांनी अधिकारी यांना लवकरात लवकर खड्डे बुजवावे अशी सक्त ताकीत दिल्याची सुद्धा माहिती आहे.
0 Response to "तुमसर भंडारा राष्ट्रीय महामार्ग च्या दुरुस्ती करिता चक्क खासदार डॉ.पडोळे उतरले रस्त्यावर ."
एक टिप्पणी भेजें