समर्थ महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा.
रविवार, 7 सितंबर 2025
Comment
नरेंद्र मेश्राम
"सापताहीक जनता की आवाज"
लाखनी :- समर्थ महाविद्यालय, लाखनी येथे दिनांक ५ सप्टेंबर २०२५ रोजी (शुक्रवार) माजी उपराष्ट्रपती व तत्त्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे महाविद्यालयाच्या भगिनी निवेदिता सभागृहात करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिगांबर कापसे होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. धनंजय गभने, विज्ञान विभाग प्रमुख डॉ. भास्कर पर्वते, प्रा. बाळकृष्ण रामटेके, राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख डॉ. बंडू चौधरी, तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. संगीता हाडगे मंचावर उपस्थित होते.
या कार्यक्रमाची विशेषता म्हणजे सर्व कार्यक्रमांचे आयोजन विद्यार्थ्यांनी केले होते. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांचा तुळस रोप व नारळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच, प्राध्यापक अभियोग्यता परीक्षा उत्तीर्ण झालेल्या प्रा. मनिषा मदनकर व प्रा. पूजा नवखरे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. नुकत्याच विद्यापीठात पुरस्काराने सन्मानित झालेल्या अर्चना वार्षिकांकाच्या संपादक मंडळाचा प्राचार्य डॉ. कापसे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये यशस्वी काडगाये हिचा प्रथम पदक मिळवल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच, गरदीप गिल, रिद्धी मेश्राम, यशस्वी कुथे, हर्षा ठवकर, समीक्षा फंदे, फरहान शेख यांनी शिक्षक दिनानिमित्त आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन राजश्री टेंभरे यांनी केले तर आभार प्रदर्शन सोनाली खेडीकर यांनी मानले. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते.
0 Response to "समर्थ महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा."
एक टिप्पणी भेजें