शिक्षक दिनी विद्यार्थांना साहीत्य वाटपातुन जन्मदिन केला साजरा
मंगलवार, 9 सितंबर 2025
Comment
• भागडी गुरुदेव मंडळ व मिञ परीवाराचा कौतुकास्पद तुत्य उपक्रम
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
लाखांदुर :- मासळ लाखांदुर तालुक्यातील भागडी गाव राष्टसंत तुकडोजी महाराज यांचे विचारांनी प्रेरित असुन यांचे कार्य स्वकृतीतुन घडविण्याचे, आचरण अंगीकृत केले आहे हे आपल्याला भागडी येथील गुरुदेव सेवा मंडळ तथा मिञ परीवारांचे कार्यातुन नियमित पाहावयास मिळत आहे. त्यांचे प्रत्यय शिक्षक दिनी ५ सप्टेंबरला त्यांचे एका सदस्यांचा पंकज उर्फ पप्पु कानिरामजी मातेरे यांचा जन्म वाढदिवस असता त्यांनी पार्ट्यांतुन पैसे जन्मदिनी खर्च न करता जि.प.वरीष्ट प्राथमिक शाळा भागडी व जि.प.प्रा.शाळा परसोडी येथील संपुर्ण जवळपास ३५० विद्यार्थांना शालेय उपयोगाची नोटबुक व पेन या साहीत्यांचे वाटप करुन साजरा करण्यात आला. भागडी येथील जि.प.व.प्रा.शाळेत शिक्षक दिन डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जयंती साजरा करण्यात आला. त्यावेळी सदर शालेय उपयोगी साहीत्यांचे वाटप पप्पु मातेरे यांचेकडुन करण्यात आले. कार्यक्रमास शा.व्य.स.अध्यक्ष ज्ञानेश्वरजी बुरडे विशेष अतिथी पंकज (पप्पू) कानिरामजी मातेरे सामाजिक कार्यकर्ता, योगराज मेश्राम सर राजेंद्रजी बुरडे सर, ज्ञानेश्वरजी दिवटे, उपसरपंच निखिल वासनिक,गुरुदेव सेवा मंडळ अध्यक्ष गणेश बगमारे, तमुस अध्यक्ष राहुल नाकतोडे दिनेशजी नाकतोडे, चेतनजी भुरले, गोपाल तोंडरे मान्यवरांसह मुख्याध्यापक समृतवार सर , कुळसुगे सर तथा सर्व शिक्षक वृंद तर परसोडी/नाग येथील कार्यक्रमास सरपंच अनिता बोरकर , रामभक्त निसार सरपंच आथली, ग्रामपंचायत, सदस्य शेंडे ताई, बोरकर ताई , मुख्यध्यापक खटके यांचेसह गुरुदेव मंडळ व मिञ परीवार भागडी येथील सदस्यांचे उपस्थितील विद्यार्थांना शालेय उपयोगी साहीत्यांचे वाटप करुन पप्पु मातेरे यांनी आपला जन्मचा वाढदिवस साजरा केला असुन त्यावेळी सर्व उपस्थितांकडुन पप्पु मातेरे यांना पुष्पगुच्छ देवुन शुभेच्छा देण्यात आल्या. सदर वाढदिवसांची कौतुकास्पद चर्चा परीसरात सुरु आहे.
0 Response to "शिक्षक दिनी विद्यार्थांना साहीत्य वाटपातुन जन्मदिन केला साजरा "
एक टिप्पणी भेजें