विषय: मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत पंचायत समिती लाखनी तर्फे कार्यशाळेचे आयोजन.
बुधवार, 10 सितंबर 2025
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्त प्रतिनिधी
भंडारा :- मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान दिनांक 17 सप्टेंबर 2025 पासून सुरू होत, ग्रामपंचायतींना त्यांच्या कार्यक्षमतेनुसार प्रोत्साहित करणे स्पर्धात्मक वातावरण निर्माण करणे यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना पुरस्कार देण्यासाठी हे अभियान सुरू करण्यात येणार आहे, या अभिनयाच्या पूर्वतयारीसाठी तसेच जनजागृतीसाठी पंचायत समिती समिती लाखनी तर्फे स्वागत सभागृह येथे दिनांक 10 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता एक महत्त्वपूर्ण कार्यशाळा आयोजित केली जात आहे. या कार्यशाळेचे आयोजन पंचायत समितीच्या सभापती, सन्माननीय अश्विनी मोहतुरे/ कानेकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले आहे.
कार्यशाळेमध्ये सर्व जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच, कार्यशाळेत तालुक्यातील सर्व 71 ग्रामपंचायतीचे सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी आणि रोजगार सेवक यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सर्व संबंधित व्यक्तींना कृपया याठिकाणी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येते.
कार्यशाळेची माहिती:
तारीख: 10 सप्टेंबर 2025
वेळ: सकाळी 11 वाजता
ठिकाण =स्वागत सभागृह लाखनी.
0 Response to "विषय: मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत पंचायत समिती लाखनी तर्फे कार्यशाळेचे आयोजन."
एक टिप्पणी भेजें