नाकाडोंगरी आरोग्य वर्धिनी केंद्रात एमबीबीएस डॉक्टरांची गरज.
रविवार, 14 सितंबर 2025
Comment
MBBS डाक्ट रनियुक्ती न केल्यास आंदोलनाचा इसारा!...
ठाकचंद मुंगुसमारे
(अध्यक्ष)
वि.वि.से.नाकाडोंगरी
प्रशासनाने लेखी निवेदन देऊन तात्काळ पावले उचलून M.B.B.S डाक्टर ची नेमनूक करावी.
राजू देशभ्रतार
जि.प.सदस्य आष्टी
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्त प्रतिनिधी
भंडारा :- जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी येथे असलेले आरोग्य वर्धिनी केंद्र हे महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवर असल्याने येथे दररोज शेकडो रुग्ण उपचारासाठी येतात. जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ओपीडी असणारे हे केंद्र असूनही, येथे अद्यापही एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध नाहीत. सध्या या केंद्राचा कारभार बीएएमएस डॉक्टरांच्या खांद्यावर असल्याने स्थानिक नागरिक व परिसरातील लोकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. नाकाडोंगरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे विस्तारीकरण करून
ते आरोग्य वर्धिनी केंद्र बनवण्यात आले आहे. कारण या केंद्रांतर्गत ४५ गावे आणि मध्यप्रदेशमधील रुग्णदेखील उपचारासाठी येतात. मात्र, गेल्या एका वर्षापासून येथे एमबीबीएस डॉक्टरांची नेमणूक न झाल्याने नागरिकांना योग्य वैद्यकीय सेवा मिळत नाही. अनेकदा रुग्णांना तातडीने तुमसर किंवा भंडारा येथील रुग्णालयांमध्ये रेफर केले जाते. त्यामुळे गरीब व सामान्य रुग्णांना आर्थिक, मानसिक आणि शारीरिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे, लवकरात लवकर येथे एमबीबीएस डॉक्टरांची नेमणूक करावी. अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.
0 Response to "नाकाडोंगरी आरोग्य वर्धिनी केंद्रात एमबीबीएस डॉक्टरांची गरज."
एक टिप्पणी भेजें