विज्ञान नाट्योत्सवात जि.प. हायस्कूल वरठीने प्रथम क्रमांक पटकावला.
बुधवार, 10 सितंबर 2025
Comment
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा:- राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव अंतर्गत मोहाडी तालुकास्तरीय नाट्य स्पर्धा सुदामा विद्यालय मोहाडी येथे संपन्न झाली.
या स्पर्धेत जिल्हा परिषद हायस्कूल व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय वरठी येथील हरित तंत्रज्ञान - आपली ताकद, आपले भविष्य या नाटकाला उत्कृष्ट संहिता, सादरीकरण व अभिनय यासाठी प्रथम पुरस्काराने गौरवान्वित करण्यात आले.
हे नाटक जिल्हास्तरीय स्पर्धेत मोहाडी तालुक्याचे प्रतिनिधित्व करेल. या यशाबद्दल जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथभाऊ फेंडर, सरपंच चांगदेव रघुते, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ. प्रियंका मते, मुख्याध्यापक विजय हटवार, गटशिक्षणाधिकारी शरद कुकडकर, केंद्र प्रमुख नरेंद्र उरकुडे यांनी अभिनंदन केले.
हे नाट्यपुष्प कु. जयश्री कोळी लिखित
कु. वर्षा मेश्राम यांच्या मार्गदर्शनात कु. अश्विनी कोल्हे यांच्या सहकार्याने हे सादरीकरण करण्यात आले.
कलावंत रहमान शेख, काव्यांश ऊके, अथर्व कटरे, हरेश्वर माळवे, अनोखी फुलबांधे, नैयंशी पारधी , तनवी पारधी,आर्या मेश्राम यांचा उत्कृष्ट अभिनयकरुन सादरीकरण केले.
जयप्रकाश गायधने, हरीष समरीत, सुनिता गायधने, विकास कोवे, योगिता देशकर, दिलीप दहिवले, चित्रा हटवार, भास्कर कुंभारे, अंजली भोयर, सुनील शेंडे, सुरेखा धुर्वे, विकास भुरे, दक्षता गाढवे, शुभांगी ठवकर, सुलोचना भुरे, रेखा राऊत, शिवशंकर रगडे, लोकराम मस्के , उमेश लुटे,गीता दहिवले यांनी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
0 Response to "विज्ञान नाट्योत्सवात जि.प. हायस्कूल वरठीने प्रथम क्रमांक पटकावला."
एक टिप्पणी भेजें