अड्याळ बस थांब्यावर अवैध प्रवासी वाहनांचा कब्जा
बुधवार, 17 सितंबर 2025
Comment
कुलदिप गंधे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा/अड्याळ :- पवनी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अड्याळ गावात दररोज जवळपास २५ ते ३० गावांच्या नागरिकांचा संपर्क येत असून ये-जा करण्यासाठी विद्यार्थी, मजूर वर्ग व वृद्ध अशांची आव्हान इथून असते.
मुख्य बस थांब्यावर अवैध प्रवासी वाहन उभे असल्यामुळे कित्येकता वृद्धांची व विद्यार्थ्यांची बस सुटून तारांबळ होत असतो. याकडे लक्ष कोण देणार? की एखादा अपघात झाल्यावरच हे शासनाला
कळणार का? मागील काही काळात राम सारख्या सहा वर्षीय
बालकाच्या प्रवासी वाहतूकीमुळे
येथे अपघात होऊन मृत पावला होता. अशाच घटनेची ग्रामवासी व
प्रशासन वाट तर बघत नसावा ना? असा प्रश्न सुज्ञ नागरिकांच्या मनात
येत आहे. भंडारा-पवनी मार्ग दोन जिल्ह्यांना जोडत असल्याने या मार्गावर नेहमीच वर्दळ दिसून येते.
या मार्गावर खाजगी प्रवासी वाहने मोठ्या प्रमाणात धावत असल्याने जनू काही त्यांच्यात स्पर्धा पाहवयास मिळत आहे.
0 Response to "अड्याळ बस थांब्यावर अवैध प्रवासी वाहनांचा कब्जा"
एक टिप्पणी भेजें