शेवटी बँक मित्रच आले बँक मित्रासाठी धावून
बुधवार, 17 सितंबर 2025
Comment
कुलदिप गंधे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- अपुरे मिळणारे कमिशन आणि कामासाठी येत असलेला ताण यामुळे वर्धा जिल्ह्यातील एका बँक मित्राने 23 जुलै रोजी आत्महत्या केली.
सविस्तर बातमी अशी आहे की वर्धा जिल्ह्यातील बँक मित्र *श्री. निलेश गणोरकर रा.- चिस्तूर ता.- तळेगांव जिल्हा- वर्धा हे एका राष्ट्रीयकृत बँकेचे* बँक मित्र म्हणून मागील ५ वर्षांपासून कार्यरत होते ,
बँक मित्र हे प्रधानमंत्री जन धन योजना अंतर्गत,
नवीन खाते काढणे (५५.२२ कोटी), त्यांच्या ठेवी गोळा करणे, त्यासोबत प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना , प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना, अटल पेन्शन योजना, सुकन्या समृद्धी योजना, PPF योजना, सारख्या योजना बँक मित्र मार्फत गावागावांमध्ये राबवतात. यात बँक मित्रांचा वाटा अधिक असला तरी त्याला पाहिजे त्या स्वरूपाचा मोबदला मिळत नाही. त्यातही मध्यस्त आपला वाटा पूर्वीच काढून घेतो. तसेच जनधन योजनेंतर्गत ५००० रु. व गाळे व वीजबिल खर्च योजनेंतर्गत २५००रु. असे दरमहा मानधन बँक मित्रांना मिळणार होते ते अजूनही त्यांना मिळाले नाही. या व अशा अनेक कारणामुळे बँक मित्रांची स्थिती वाईट होत चालली आहे. अशामुळेच शेवटी त्या बँक मित्राने आत्महत्या केली, परंतु त्यामध्ये सरकारने किंवा त्या बँकेने सुद्धा त्या मित्राकडे लक्ष दिले नाही, शेवटी महाराष्ट्र राज्य बँक मित्र संघटनेच्या वतीने त्या बँक मित्राच्या कुटुंबाला २५,००० च्या अनुदान देण्यात आले.
सरकारला वित्तीय समावेशन कार्यक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी बँक मित्रांनी केलेले कार्य लक्षात घेता, त्या बँक मित्रांना स्थैर्य मिळवून देणे, कामाचा योग्य मोबदला देणे, मानधन देणे, महिला बँक मित्रांना प्रसूती रजा देणे, बँक मित्रांचा व व्यवहारातील रक्कमेला विमा देणे, त्यांना सामाजिक सुरक्षितता देणे इ. मागण्यांकडे सरकारने लक्ष देणे आजच्या काळाची गरज आहे. अशी मागणी महाराष्ट्र राज्य बँक मित्र संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे.
0 Response to "शेवटी बँक मित्रच आले बँक मित्रासाठी धावून"
एक टिप्पणी भेजें