श्री संताजी महाविद्यालयात एड्स जनजागृती कार्यक्रम.
बुधवार, 10 सितंबर 2025
Comment
नरेंद्र मेश्राम
"सापताहीक जनता की जनता"
पालांदूर :- स्थानिक श्री संताजी कला व विज्ञान महाविद्यालय पालांदूर येथे रेड रिबन क्लब, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, आयसीटीसी विभाग ग्रामीण रुग्णालय लाखनी, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक जिल्हा रुग्णालय, भंडारा. यांच्या माध्यमातून एड्स विषयक जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. गिरीश लांजेवार तर प्रमुख वक्ते म्हणून आयसीटीसी ग्रामीण रुग्णालय लाखनीच्या सौ.सीमा बावनकर होत्या. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. संजयकुमार निंबेकर, जिल्हा समन्वयक राष्ट्रीय सेवा योजना भंडारा जिल्हा, डॉ. रमेश बागडे, डॉ. राजेंद्र खंडाईत, प्रा. प्रमोद शेंडे उपस्थित होते. एड्सच्या नियंत्रणात युवकांचा सहभाग काय असला पाहिजे आणि या रोगाविषयी जनजागृती करण्याच्या दृष्टीने युवकांनी कोणती जबाबदारी स्वीकारावी, तसेच या रोगाची लक्षणे आणि यापासून सुरक्षित राहण्याकरिता काय उपाययोजना करता येईल या विषयावर सखोल मार्गदर्शन सौ सीमा बावनकर यांनी केले. सर्व उपस्थित पाहुण्यांचे समुचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मनोज मोहतुरे यांनी केले तर आभार प्रा. प्रमोद शेंडे यांनी मानले
कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आणि महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते.
0 Response to "श्री संताजी महाविद्यालयात एड्स जनजागृती कार्यक्रम."
एक टिप्पणी भेजें