नांदेड विमानसेवा पूर्वत सुरू करण्यात आली आहे राज्यसभा खासदार डॉ अजित गोपछेडे यांच्या प्रयत्नाला यश
बुधवार, 10 सितंबर 2025
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
नांदेड :- येथील गुरुगोविंद सिंग जी विमानतळाची धावपट्टी खराब झाल्याने येथील विमानसेवा स्थगित करण्यात आली होती. मात्र नांदेडची विमानसेवा पूर्ववत सुरू करावी यासाठी मी राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, केंद्रीय मंत्री राम मोहन नायडूजी , विमान राज्यमंत्री मुरलीधर मोहोळजी यांच्याकडे पाठपुरावा केला होता . त्यामुळे आजपासून नांदेडचे विमानतळ पूर्ववत सुरू होत आहे.
नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे नांदेड विमानतळालाही फटका बसला होता. यामुळे विमानतळाच्या धावपट्टीवर अनेक खड्डे पडले होते. धावपट्टीवर खड्डे पडल्याने विमान सेवेला स्थगिती देण्यात आली होती. त्यामुळे येथील उड्डाण बंद झाली होती. परिणामी नांदेडच्या तीर्थक्षेत्रासह शिक्षण उद्योगक्षेत्राला फटका बसला होता ही बाब लक्षात घेता नांदेड येथे देश विदेशातून गुरुद्वारात तख्त सचखंड हुजूर साहेब येथे दर्शनासाठी येणाऱ्या प्रवाशांना गैरसोय होऊ नये , उद्योजक , व्यापारी , विद्यार्थी , एन आर आई , शासकीय अधिकारी , प्रगतशील शेतकरी आदीनाही विमानसेवेचा लाभ मिळावा
यासाठी केंद्रीय उड्डाण मंत्री राममोहन नायडूजी , केंद्रीय विमान राज्यमंत्री मुरलीधर मोहोळजी यांची भेट घेऊन हे विमानतळपूर्वत सुरू करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. आज उपराष्ट्रपती निवडीसाठी मतदानाची प्रक्रिया सुरू असतानाही अत्यंत घाईगडबडीच्या वेळेतही केंद्रीय मंत्र्यांची भेटी घेऊन नांदेड येथील विमानतळ सुरू करण्यासाठी चर्चा केली.
त्यामुळे केंद्रीय उड्डाण मंत्री नायडू आणि मोहोळ यांनी संबंधित विभागाचे अधिकाऱ्यांना तातडीने निर्देश देत हे विमानतळ पूर्वत सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार उद्या दिनांक 10 सप्टेंबर पासून नांदेड येथील विमानतळ पूर्ववत सुरू होत आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय विमान मंत्री राममोहन नायडूजी, विमान राज्यमंत्री मुरलीधर मोहोळजी ,माजी मुख्यमंत्री खासदार अशोकरावजी चव्हाण यांची मनपूर्वक आभार
0 Response to "नांदेड विमानसेवा पूर्वत सुरू करण्यात आली आहे राज्यसभा खासदार डॉ अजित गोपछेडे यांच्या प्रयत्नाला यश"
एक टिप्पणी भेजें