जिजाऊ महिला सहकारी पत संस्था चिचाळ वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न.
रविवार, 21 सितंबर 2025
Comment
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- पवनी तालुक्यातील जिजाऊ महिला सहकारी पत संस्था म. चिचाळ ची वार्षिक सर्व साधारण सभा पत संस्थेच्या अध्यक्षा सौ मनिषा राजेश नंदपुरे यांचे अध्यक्षते खाली दिनांक 20 सप्टेंबर 2025 रोज शनिवार ला संस्थेचे कार्यालय येथे संपन्न झाली सभेला सर्व संचालिका आणि महिला सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सावित्रीबाई फुले. माँ जिजाऊ. अहिल्याबाई होळकर यांचे प्रतिमेचे पूजन आणि दिप प्रज्वलन करून सभेची सुरुवात करण्यात आली सर्व संचालिका आणि अतिथी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले प्रसंगी अध्यक्षा यांनी आपले मनोगत व्यक्त केले अहवाल वाचन व्यवस्थापक आकाश घटारे यांनी केले प्रसंगी 10 वी आणि 12 वी बोर्ड परीक्षेत प्रथम आणि द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना गौरव प्रमाणपत्र इंग्रजी व्याकरण पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाला संस्थापक प्रा राजेश नंदपुरे. चुन्नीलाल लांजेवार संचालक. जगतराम गभने उपसरपंच दीपक शेंद्रे धनंजय लोहकर सौ प्रतिभा मोटघरे आणि सर्व संचालिका आणि प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन मीनाक्षी लेंडे यांनी तर आभार मुकेश रामटेके यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गीता नंदपुरे. कृष्णा जिभकाटे लिपिक यांनी सहकार्य केले
0 Response to "जिजाऊ महिला सहकारी पत संस्था चिचाळ वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न."
एक टिप्पणी भेजें