-->

Happy Diwali

Happy Diwali
सेवा पंधरवाडा" कार्यक्रमात प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्याकरिता भंडारा तालुक्यात शिबीराचे आयोजन.

सेवा पंधरवाडा" कार्यक्रमात प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्याकरिता भंडारा तालुक्यात शिबीराचे आयोजन.

कुलदिप गंधे 
"साप्ताहिक जनता की आवाज"
 
भंडारा :- छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातंर्गत दिनांक 17 सप्टेंबर ते 02 ऑक्टोंबर, 2025 या कालावधीमध्ये "सेवा पंधरवाडा साजरा करण्याबाबतचे शासनाचे निर्देश आहेत. सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक होण्याकरीता सेवा पंधरवाडयात राबवावयाचे उपक्रम हे तीन टप्प्यांमध्ये राबवयाचे असून 'नावीन्यपूर्ण उपक्रम" महणून प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्याबाबतचे शिबीर आयोजित करण्याचे निर्देश मा. जिल्हाधिकारी भंडारा यांनी तहसिलदार भंडारा यांना दिले होते.

त्यानुसार तहसिलदार भंडारा यांचेकडून भंडारा तालुक्यातील 1) ग्रा.पं. खैरी पुनर्वसन (पिपरी, खैरी, सालेबडी, संगम व पिंडकेपार येथील प्रकल्पग्रस्त यांचे करिता), 2) ग्रा.पं. सुरेवाडा पुनर्वसन (सुरेवाडा, बेरोडी, करचखेडा येथील प्रकल्पग्रस्त यांचे करिता) 3) ग्रा.पं. अर्जुनी/गिरोला पुनर्वसन (अर्जुनी, जाख, खोलापूर, सिरसघाट, टाकळी, टेकेपार, बोरगाव बु, मकरधोकडा येथील प्रकल्पग्रस्त यांचे करिता) 4) ग्रा.पं. मोदी पुनर्वसन (मौदो, इटगाव, जामगाव व बडद येथील प्रकल्पग्रस्त यांचे करिता) अशी 4 ठिकाणी दिनांक 29/09/2025 रोजी सकाळी 10.00 ते सायंकाळ 6.00 पर्यन्त शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर शिबिरात पात्र प्रकल्पग्रस्त यांचे अर्ज ऑनलाइन करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून संबंधित गावातील ग्राम महसूल अधिकारी, ग्राम पंचायत अधिकारी सेतु संचालक तसेच महसूल अधिकारी यांनी शिबिराचे ठिकाणी उपस्थित राहून प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र तयार करण्याचे संबंधाने संबंधीताना आवश्यक सहकार्य व मार्गदर्शन करण्याचे निर्देश तहसील कार्यालय भंडारा येथे दिनांक 12 सप्टेंबर 2025 ला घेण्यात आलेल्या सभेमध्ये श्रीमती लिना फलके, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) भंडारा यांचेकडून देण्यात आले आहे.

मुळ प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र तयार करण्यासाठी व प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हस्तांतरणासाठी लागणारी कागदपत्रांची यादी संबंधित गावाचे तलाठी व ग्रामपंचायत कार्यालयाकडे उपलब्ध करून देण्यात आली असून संबंधित प्रकल्पग्रस्त यांनी सदर यादीत नमूद केलेले कागदपत्र सह सदर शिबिराचे ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधेचा लाभ घेण्याचे आकान तालुका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

0 Response to "सेवा पंधरवाडा" कार्यक्रमात प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्याकरिता भंडारा तालुक्यात शिबीराचे आयोजन."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article