फुलोऱ्यावरील धान संकटात... पुन्हा सात दिवस पावसाचे!
सोमवार, 15 सितंबर 2025
Comment
उत्पादनात येणार घट, शेतकऱ्यांवर अस्मानी संकट!
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा/पालांदूर :- गत सात दिवसापासून जिल्ह्यात दररोज कमी जास्त प्रमाणात पावसाची हजेरी लागत आहे. काही ठिकाणी तर विजांच्या कडकडाटासह वादळ वाऱ्यासह पावसाची हजेरी लागली आहे. अशा या रोजच्या पावसामुळे फुलोऱ्यावरील धानपीक संकटात सापडले आहे. फुलोर पावसामुळे व वादळामुळे खाली पडते. नित्याच्या पावसाने लोंभीवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे. धान उत्पादकावर अस्मानी संकट डेरे दाखल आहे. पुन्हा पुढचे सात दिवस पावसाचा अंदाज व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात अंदाजे १,८७००० हजार क्षेत्रफळावर उन्हाळी धानाचे उत्पादन लागवडी खाली आहे. जुलैपासून पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावल्याने हंगाम सुद्धा समाधानकारक आहे. हलके ते मध्यम वाणाचे धान फुलोरा अवस्थेत आहेत. अश्या अवस्थेत मोकळे वातावरण गरजेचे असताना रोजच पावसाची हजेरी लागत असल्याने उत्पादनात घट येण्याची चिन्हे दिसत आहेत.
बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव...
रोजच्या दिवस रात्रीच्या पावसामुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव लंबीवर तयार झाला आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर धान कापणीच्या हंगाम येण्याच्या अगोदरच बुरशीजन्य रोगाने धानउत्पादकांची धाकधूक वाढवली आहे. दुधाळ लोंबीवरचाफुलोर झडत असल्याने लोंबी पूर्णपणे भरण्याची शक्यता कमी आहे. तर काही ठिकाणी लोंबी काळया व लालसर येत आहेत. पुढे आणखी मानमोडी सारखे रोग येण्याची शक्यता दाट आहे.
परतीचा मान्सून महिनाभर मुक्काम ठोकणार... अन्नधान उत्पादकांना मातीमोल करणार!
परतीच्या मान्सून १७ सप्टेंबर पासून सुरू होणार असून १८ ऑक्टोंबर पर्यंत परतणार असल्याचा अंदाज हवामान अंदाज आणि व्यक्त केला आहे. विशेषता विदर्भात परतीच्या मान्सूनचा फटका अधिक राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे हलके ते मध्यमधानाची कापणी बांधणे व मळणी सुद्धा संकटात येणार आहे. त्यामुळे धान उत्पादकांची धाकधूक वाढली असून रोजच हवामान अपडेट लक्षात घेणे सुरू झाले आहे.
शेतकरी बांधवांनी धान फुलोराच्या अवस्थेत असेल तर बांधानात पाणी साचवून ठेवू नये. दररोज पिकाचे निरीक्षण करून आलेल्या रोगावर वेळीच तज्ज्ञांच्या सल्ल्याने नियंत्रण फवारणी करून पीक सावरण्याचा प्रयत्न करावा.
मंडळ कृषी अधिकारी
विकास झलके पालांदूर
0 Response to "फुलोऱ्यावरील धान संकटात... पुन्हा सात दिवस पावसाचे! "
एक टिप्पणी भेजें