डॉ. संजयकुमार निंबेकर यांची रासेयो भंडारा जिल्हा समन्वयक पदी निवड
सोमवार, 15 सितंबर 2025
Comment
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
पालांदूर :- येथील श्री संताजी कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. संजयकुमार निंबेकर यांची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या भंडारा जिल्हा समन्वयकपदी निवड करण्यात आली आहे.
ही निवड राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे आयोजित बैठकीत पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे रासेयो संचालक डॉ. सोपानदेव पिसे होते. डॉ. निंबेकर यांच्या निवडीमुळे जिल्ह्यातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्याला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या बैठकीमध्ये भंडारा जिल्हा समन्वयक पदासोबतच इतरही काही महत्त्वाच्या पदांवर निवडी करण्यात आल्या. यामध्ये डॉ. नरेश आंबीलकर, डॉ. वंदना मोटघरे, आणि डॉ. विजय दरवडे यांची विभागीय समन्वयक म्हणून निवड झाली आहे. या निवडींमुळे रासेयोचे कार्य अधिक प्रभावीपणे राबवले जाईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. डॉ. निंबेकर यांच्या निवडीबद्दल वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष डॉ. सोमदत्त करंजेकर श्री संताजी कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
0 Response to "डॉ. संजयकुमार निंबेकर यांची रासेयो भंडारा जिल्हा समन्वयक पदी निवड"
एक टिप्पणी भेजें