देवरी येथे महिला भगिनी स्वच्छते करिता सरसावल्या!..
सोमवार, 15 सितंबर 2025
Comment
देवरी येथे महिला भगिनी स्वच्छते करिता सरसावल्या! मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान , विविध पुरस्कारांची मेजवानी
नरेंद्र मेश्राम
"सापताहीक जनता की आवाज"
पालांदूर :- महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत लाखनी तालुक्यातील देवरी येथे महिला भगिनींनी स्वच्छते करिता एक पाऊल पुढे टाकीत गावाच्या विकासाकरिता सकारात्मकता दाखवीली .ग्रामपंचायत कार्यालयापासून स्वच्छतेला आरंभ केला. विशेष म्हणजे विद्यार्थिनींनी सुद्धा सहभाग घेत माजी सरपंच यांनी सुद्धा यात सहभागी होत गावच्या स्वच्छतेचा संदेश पुढे केला. देवरी येथे पूर्वनियोजन करून ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आला. यानिमित्ताने सरपंच उपेंद्र शेंडे,सदस्य लक्ष्मी मेश्राम, माजी सरपंचा सुनीता पत्रे, वैशाली प्रधान, शीतलताई गिरी, ताराबाई वाघडकर,मंदाबाई मेंढे, वेदांती मेश्राम,लताताई मेंढे, संतोषी फटिंग, निशांत प्रधान, जयश्री मेश्राम, गुंजन फटिंग,गयाबाई मेश्राम, पल्लवी प्रधान,स्नेहा मेश्राम,परिचर अशोक मेंढे व गावातील महिला व मुली, तरुण मंडळी तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. खासकरून यानिमित महिलांचा खूप मोठा सहभाग लाभला. येत्या काळात सुद्धा आमच्या गावासाठी असेच प्रयत्न करत राहू असे महिलांनी ठाम विश्वास सरपंचाला दिल. सर्वांचा सहभाग लाभल्यामुळे सरपंचांनी गावस्वच्छतेचा मूलमंत्र जपत शासनाच्या स्वच्छता पुरस्काराचे आपणही धनी होऊ अशी महत्त्वाकांक्षा उरी बाळगली आहे. अशी आहेत पुरस्काराचे स्वरूप... राज्यस्तरावर पाच कोटी आयुक्त स्तरावर १ कोटी, ८० लाख ,६० लाख रुपयाचे बक्षीस जिल्हास्तरावर ५०,३० व २० लाख रुपयाची नियोजन आहे. तालुकास्तरावर १५ ,१२,८, व ५ लाख रुपयांचे सुद्धा विशेष बक्षीसाचे आयोजन केले आहे. फोटो:
0 Response to "देवरी येथे महिला भगिनी स्वच्छते करिता सरसावल्या!.."
एक टिप्पणी भेजें