जिजाऊ महिला सहकारी पत संस्था चे अध्यक्ष पदी सौ मनिषा राजेश नंदपुरे यांची एकमताने निवड
बुधवार, 10 सितंबर 2025
Comment
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- जिजाऊ महिला सहकारी पत संस्था म. चिचाळ नो.क्र.431/2024 संचालिका निवडणूक 2025 ते 2030 ची निवडणूक प्रक्रिया अविरोध पार पडली . दिनांक 9/9/2025. मंगळवार ला अध्यक्षा आणि उपाध्यक्षा यांची निवड एकमताने करण्यात आली. सौ मनिषा राजेश नंदपुरे अध्यक्ष तर सौ मंजुषा जगतराम गभने उपाध्यक्ष पदी एकमताने निवड करण्यात आली. अमोल कोळेकर निवडणूक निर्णय अधिकारी सहायक निबंधक कार्यालय पवनी यांचे उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पाडली. संचालिका म्हणून सौ लक्ष्मी डोकरे,सौ सुजाता रामटेके,सौ धनश्री लोहकर,सौ अल्का शास्त्रकार,सौ सुनंदा नंदपुरे ,सौ वर्षा जिभकाटे सौ रेखा शेंद्रे अविरोध निवडून आल्या हा कामी सर्व संचालिका. संस्थापक मा नंदपुरें सर. आकाश घटारे व्यवस्थापक मीनाक्षी लेंडे लिपिक कृष्णा जिभकाटे लिपिक गीता नंदपुरे आणि सर्व कर्मचारी वर्ग यांनी सहकार्य केले ग्राहकांचा विश्वास आणि महिलांचा आर्थिक विकास आणि सामाजिक कार्य हाच दृष्टिकोन ठेवून पुढील यशस्वी वाटचाल करून विश्वासाचं नात प्रगतीच हा मूलमंत्र डोळ्यासमोर ठेऊन पुढील वाटचाल करूया असा दृढसंकल्प मनी ठेऊन सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या.
0 Response to "जिजाऊ महिला सहकारी पत संस्था चे अध्यक्ष पदी सौ मनिषा राजेश नंदपुरे यांची एकमताने निवड "
एक टिप्पणी भेजें