भंडारा जिल्हा परिषद समोर राष्ट्रीय आरोग्य अभियान कॉन्ट्रॅक्ट अधिकारी व कर्मचारी यांचे काम बंद आंदोलन सुरू
गुरुवार, 4 सितंबर 2025
Comment
• 17 दिवसापासून आंदोलनाकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- जिल्हा परिषद भंडारा समोर राष्ट्रीय आरोग्य अभियान कॉन्ट्रॅक्ट अधिकारी व कर्मचारी एकत्रिकरण समिती व एकता संघ महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा भंडाऱ्याच्या वतीने दिनांक 19 ऑगस्ट 2025 पासून आपल्या विविध मागण्यांकरिता आरोग्य सेवेतील कॉन्ट्रॅक्ट अधिकारी व कर्मचारी आपल्या न्याय मागण्या करता मागील 17 दिवसापासून काम बंद आंदोलन भंडारा जिल्हा परिषद समोर सुरू असून अजून पर्यंत जिल्हा प्रशासनाने त्यांची दखल घेतलेली नाही. त्यांना प्रोत्साहन देण्याकरता आज दिनांक 4 सप्टेंबर 2025 ला दुपारी 1 वाजता समाज प्रबोधनकार भावेश कोटांगले यांच्या समाज प्रबोधनाचा कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आलेला होता .कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय मनोज भाऊ कोटांगले यांना श्रद्धांजली अर्पित करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी पत्रकार संजीव भांबोरे यांनी कर्मचारी समस्येबाबत प्रत्यक्ष भेटून चर्चा केली असता कर्मचाऱ्यांनी सांगितले की ,राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कॉन्ट्रॅक्ट अधिकारी व कर्मचारी यांचे दिनांक 14 मार्च 2024 चे शासन निर्णयानुसार त्यांना सेवेत समायोजन करण्यात आलेले नाही. प्रकाश आंबीटकर यांची प्रत्यक्ष भेटीदरम्यान त्यांनी 8 जुलै 2025 ला मुख्यमंत्री व सार्वजनिक आरोग्य विभाग सचिव क्रमांक 1 यांची मीटिंग लावणार असल्याचे सांगितले .या दरम्यान 10 व 11 जुलै 2025 ला मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलन सुद्धा करण्यात आले .त्यावेळी 10 जुलै 2025 ला नामदार आरोग्य मंत्री यांनी राष्ट्रीय आरोग्य एकत्रिकरण समितीच्या समितीला भेटीदरम्यान समायोजन प्रक्रियेला गती देण्याचे आश्वासन दिले. परंतु कुठलाही निर्णय शासन स्तरावरून घेण्यात आलेला नाही. जवळपास भंडारा जिल्ह्यात 700 कर्मचारी काम बंद आंदोलनात सहभागी झालेले आहेत. आंदोलन यशस्वी करण्याकरता डॉक्टर सचिन लहाने, डॉक्टर आशिष माटे, डॉक्टर सुषमा गजभिये ,डॉक्टर श्रीकांत आंबेकर ,डॉक्टर भास्कर खेडेकर, डॉक्टर राजेंद्र सोनवणे, डॉक्टर राजू लांजेवार ,जितेंद्र अंबादे,प्रियंका मिश्रा, निलेश गिरी ,कोमल भाजीपाले ,शिवशंकर शेंडे, धनंजय कळंबे ,संदीप वासनिक, रवींद्र झोडे ,विलास गभणे, भूपेंद्र ब्राह्मणकर, रणजीत कोल्हटकर, मुकेश भेदे ,अभय कांबळे ,अनिता गवले, शुभांगी बांते , आभा उजवणे ,मुकेश बाबरे, ज्ञानेश्वर बालपांडे, तुषार पटले , विशाखा जांभुळकर ,नफीसा अली सय्यद ,दिशा शेंडे, शुभम फडर स्नेहा दहिवले, अजित टेंभेकर, रिता ईश्वरकर ,रसचलराज मस्के ,शीला माटे, अरुण रेहपाडे, मीना कुंभरे,भारत गणवीर ,सुषमा बांगडकर, जागेश्वर तिडके, ममता माजी, आंदोलन यशस्वी करण्याकरता सहकार्य करीत आहेत.
0 Response to "भंडारा जिल्हा परिषद समोर राष्ट्रीय आरोग्य अभियान कॉन्ट्रॅक्ट अधिकारी व कर्मचारी यांचे काम बंद आंदोलन सुरू "
एक टिप्पणी भेजें