गणेश मंडळाला ठाणेदार सतीश बंसोड यांची भेट.
गुरुवार, 4 सितंबर 2025
Comment
नरेंद्र मेश्राम
"सापताहीक जनता की आवाज"
पालांदूर (चौ.) :- येथील श्री संत कलबास्वामी सार्वजनिक गणेशोत्सव वर्षे ३रे असून या मंडळाला पालांदुर येथील ठाणेदार सतीश बंसोड यांनी नुकतीच भेट दिली.
याप्रसंगी ठाणेदार बंसोड यांनी आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की,॓धार्मिक, सामाजिक आचारसंहितेचे पालन करावे, मंडळाला कोणत्याही प्रकारची आच येणार नाही असे कार्यक्रम आयोजित करावे.त्याचबरोबर समाज नशामुक्त व्हावे यासाठी नशा मुक्त अभियान राबविण्यात यावे.या मंडळाणे आरोग्य शिबीर घेतले हे एक स्तुत्य उपक्रम आहे.याप्रमाणेच देश, समाज हिताचे कार्यक्रम आयोजित करावे.असे आपल्या मार्गदर्शनात म्हणाले.व मंडळाच्या कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या.मंडळातर्फे ठाणेदार बंसोड यांचे शाल श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.
याप्रसंगी अध्यक्ष,अंकुश नंदनवार, उपाध्यक्ष खुशाल नंदनवार,नितेश नंदनवार,शंकर नंदनवार,रौणक लांजेवार,शंकर लांजेवार, वैभव नंदनवार,शुभंम भेदे व महेश नंदनवार उपस्थित होते.
0 Response to "गणेश मंडळाला ठाणेदार सतीश बंसोड यांची भेट."
एक टिप्पणी भेजें