साकोली येथे आझाद समाज पार्टी ची पक्ष प्रवेश व समीक्षा बैठक संपन्न.
सोमवार, 15 सितंबर 2025
 Comment 
"साप्ताहिक जनता की आवाज" 
वृत्त प्रतिनिधी 
साकोली :- येथे आझाद समाज पार्टी ची    (कांशीराम) जिल्हा भंडारा ची समीक्षा बैठक आणि पक्षप्रवेश ची बैठक पार पडली                                                                      आज दिनांक 13 / 9 / 2025 ला विश्रामगृह साकोली जिल्हा भंडारा तालुका स्तरीय समीक्षा बैठक आणि पक्षप्रवेश च्या आयोजन करण्यात आले होते त्यावेळेस आजाद समाज पार्टी (कांशीराम ) याबद्दल सखोल माहिती तसेच पार्टीचे उद्देश कार्य तसेच नगीना संसद एडवोकेट चंद्रशेखर भाई आझाद  यांच्या त्याग त्याग कार्य सांगण्यात आला सगळ्या गोष्टी आझाद समाज पार्टी (कांशीराम) च्या सदस्यांनी सदस्यांना समजावून सांगितले त्या सगळ्यांना ऐकून सर्व कार्यकर्ते प्रभावित झाले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच माननीय कांशीराम आणि एडवोकेट चंद्रशेखर आझाद यांच्या कार्याला भंडारा जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात पोहोचण्याचा कार्य जोमाने करून असे सगळ्यांनी आश्वासन दिले आणि उपस्थित अनेक लोकांनी पार्टीची सदस्यता ग्रहण केली. यावेळी प्रमुख उपस्थिती पूर्व विदर्भ सचिव ज्ञानचंद्र जांभुळकर , भंडारा जिल्हा महासचिव अश्विन गोस्वामी, भंडारा जिल्हा सचिव अमोल भिवगडे, भंडारा जिल्हा सचिव रवींद्र जनबंधू , जिल्हा कोषाध्यक्ष संतोष उकनकर प्रामुख्याने उपस्थित होते तसेच सदस्य गण बाबुराव मेश्राम, शिवप्रसाद मेलाक, भूपेंद्र मेश्राम, रवींद्र हुमणे, राजकुमार बोदरा, प्रकाश गायधने, सचिन रंगारी, लीलाधर रामटेके, मोना मेश्राम, शितल कोटांगले, साहिल मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते तसेच अनेक सदस्य खूप संख्येने उपस्थित होते.
0 Response to "साकोली येथे आझाद समाज पार्टी ची पक्ष प्रवेश व समीक्षा बैठक संपन्न. "
एक टिप्पणी भेजें