जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथील आरोग्य व्यवस्था वाऱ्यावर...
सोमवार, 15 सितंबर 2025
Comment
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथील आरोग्य प्रशासनाच्या (डॉक्टरांच्या) हलगर्जीपणामूळे विलास डोंगरे वय २७ वर्षे या रुग्णाचा आयसीयु मध्ये जीव गेला. वेळेवर उपचार न करता, रुग्णाला रक्ताची आवश्यकता असताना सुद्धा रक्त न दिल्यामुळे रुग्नाचा म्रुत्यु. काल पासून रक्त मागवून ठेवण्यात आले परंतु ते रक्त रुग्नाला चढविण्यास डॉक्टरांना वेळच मिळाले नसल्यामुळे अखेर त्या रुग्णास जीव गमवावा लागला.
जिल्हा सामान्य रुग्णालय, भंडारा येथे रुग्णांना आवश्यक त्या मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. रुग्णालयातील वार्डांमध्ये स्वच्छतेचा अभाव असून सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. पिण्याच्या पाण्याची व बाथरूममधील पाणीपुरवठ्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.
तसेच, रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. डॉक्टरांचा हलगर्जीपणा, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी असलेले दुर्लक्ष व असहकार्यपूर्ण वर्तन यामुळे सामान्य जनतेच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अशा दुर्लक्षित डॉक्टर वा जिम्मेदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे.
0 Response to "जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथील आरोग्य व्यवस्था वाऱ्यावर... "
एक टिप्पणी भेजें