सर्वज्ञश्री चक्रधर स्वामी लीळा चरित्रातील काही भाग.
मंगलवार, 30 सितंबर 2025
Comment
संकलन
हर्षवर्धन श्री देशभ्रतार.
स्मरण स्वामींचा एकांक लिळा पात्र परीचय.
साप्ताहिक जनता की आवाज"
साहित्य वृत्त
भाग :- रामदेव (दादोस)
रामदेव उर्फ दादोस हे वडनेरला राहाणारे ब्राह्मण होते. त्या गावातील वटेश्वरचा गुरव व रामदेव यांची खूप मैत्री होती. दोघांनाही चमत्कार करणाऱ्यांविषयी भलतेच आकर्षण होते. त्यामुळे ते नेहमी या विषयावर गप्पा करीत असे. रामदेवाची वटेश्वरावर विशेष श्रद्धा होती. त्यामुळे स्नानादी प्रात:कर्मे आटोपल्यावर सगळ्यात आधी ते वटेश्वराच्या दर्शनाला येत असत. रामदेव हे कणवेचे जीव होते. त्यामुळे स्वामी वडनेरला आले. तेव्हा पुजाऱ्याकडून त्यांच्या आगमनाची व अगाधतेची वार्ता मिळाल्याबरोबर रामदेवास* *स्वामींना भेटण्याचा वेध लागला. त्वरित ते स्वामींच्या भेटीस निघाले.
काटीवनी गोपाळांच्या सोबत आरोगणा झाल्यावर स्वामी वडनेरकडे येण्यास निघाले. वडनेरला पोहोचल्यावर ते पहुड स्वीकारण्यासाठी वटेश्वराच्या दोवळात गेले. वटेश्वराच्या देवळात त्यांचे आगमन झाले. तेव्हा तिथला पुजारी धुपार्ती करून जातांना म्हणाला, "देव हो! येथे देवाचे दागिने वस्त्रे आहेत. रात्री ते चोरण्याची.
भिती असते म्हणून देऊळ कुलूप लावून बंद करावे लागते तरी आपण पलीकडच्या उत्तरेश्वराच्या देवळात जाऊन निद्रा करावी स्वामींनी ते मान्य केले व स्वामी तेथुन उत्तरेश्वराच्या देवळात जातात. त्यानंतर तिथेच पहुड स्वीकारला. पुजारी गावात गेला जेवण केले व झोपण्यास गेला तेव्हा त्याला एकदम आठवण आली, “अरे, मी स्वामींना त्या देवळात पाठविले.पण त्या देवळात तर दोन सर्प राहातात.." तो तसाच निघाला. पण गावाच्या वेशीचा दरवाजा बंद झाला होता त्यामुळे तो परत गेला. पण रात्रभर त्याला झोप आली नाही. त्याला दुःख झाले सकाळ केव्हा होईल व केव्हा जाऊ असे त्याला होऊ लागले.
इकडे उत्तरेश्वराच्या देवळात ते दोन्ही सर्प एकमेकाशी लढता लढता स्वामींच्या वक्षस्थळावर येऊन पडले. स्वामींनी दोघांना प्रत्येकी एक एक श्रीकरी धरून विरूद्ध अंगाच्या दिशेने टाकले. त्याबरोबर त्या दोघांचे वैर संपले व ते निघून गेले.
त्यानंतर स्वामींनी पहुड स्वीकारला. प्रातःकाळी उठून चौकात बसलेले असतात तेव्हा तो पुजारी देवळात आला. त्याने स्वामींना पाहिले व दंडवते घालून श्रीचरणा लागला. आणि म्हणाला, "देव हो, इथे रात्री रोज दोन सर्प येतात व इथे राहाणाऱ्यांचा ते घात करतात हे मी आपणास सांगण्याचे विसरलो. मी पापी! मी दुराचारी आहे,' असे म्हणून तो दु:ख करू लागला. त्यानंतर म्हणाला, "रात्री मला आठवण झाली तसा मी निघालो पण गावाच्या वेशीचा दरवाजा बंद झाला होता, "जी जी, तरी आपण काय केले जी ?"
स्वामी म्हणाले, “येथे दोन सर्प होते ते रात्री एकमेकांशी भांडन करत, झुंज करत आमच्या छातीवर येउनी पडले
तेव्हा त्याने विचारले, "मग काय केले देव हो?"
स्वामी म्हणाले, “छातीवर पडल्यावर काय करणार?दोनी हाताने त्याना पकडले अन उजव्या हातीचा डाव्या हाती फेकीला अन डाव्या हातीचा उजव्या हाती फेकीला. आता हे स्थान भयमुक्त झाले " ते ऐकून पुजाऱ्यास आश्चर्य वाटले त्यानंतर स्वामी तेथून आंबजयकडे विहरणासाठी निघून गेले.
तिथे एकाच वडाच्या फांदीवर पूर्वेकडे लोंबता श्रीचरण करून स्वामी बसलेले असतात. तेव्हा वटेश्वराचा मुख्य पुजारी रामदेव असल्याने तो रोजच्या विधीसाठी वटेश्वराच्या देवळात आला. तिथला दुसरा पुजारी दादोसाचा मित्र होता तो म्हणाला, “रामा, आपण मागा ज्या ईश्वरपुरुषाचीया गोष्ट ऐकत* *होतो तसे एक ईश्वरपुरुष येथे आलेले आहेत. काय सांगू त्यांचे सौंदर्य व ऐश्वर्य! काय त्यांचे लावण्य! सामर्थ्य! ते षड्गुण संपन्न असून साक्षात ईश्वर आहेत."
त्यावर दादोस म्हणाले, "तुला त्यांचा काही अनुभव आला का?" त्यावर पुजाऱ्याने रात्रीची सर्व हकीकत सांगितली ती हकीकत ऐकून दादोसांना स्वामींचा वेध संचरला व ते म्हणाले, "ते पुरुष आता कुठे आहेत?" मग पुजाऱ्याने आंबजयच्या मंदिराकडे गेल्याचे सांगितले. तेव्हा दादोस त्वरित तेथे गेले स्वामी तिथे बसलेले होते. त्यांनी दादोसांना, 'या." म्हणून बोलविले. दादोसाने स्वामींच्या श्रीचरणाशी वंदन केले. त्यासरशी त्यांना स्थिती संचार झाला. थोडावेळ स्थितीसंचार सुख उपभोगल्यावर स्थिती भंगली. नंतर दादोस यांनी स्वामींना आरोगणेसाठी विनंती केली. स्वामींनी विनंती स्वीकारली. त्यानंतर दादोस दहीभात व आले घेऊन आले. स्वामी बसलेलेच होते.
दादोस स्वामींच्या श्रीचरणी लागले डोक्यावरच्या पांढऱ्या रंगाच्या घोंगडीचे आसन तयार केले. स्वामींना आसनावर बसविले व आरोगणा दिली; पण आले द्यायचे विसरले. आरोगणा करताना स्वामींनी त्यांना आले अर्पण करायची आठवण करून दिली. दादोस यांनी त्वरित कंबरेला खोचलेले आले काढून अर्पण केले. नंतर स्वामींची आरोगणा झाली गुळळा विडा झाला. तिथेच निद्रेसाठी बिछाना झाला. मग स्वामींनी तिथे पहुड स्वीकारला.
0 Response to "सर्वज्ञश्री चक्रधर स्वामी लीळा चरित्रातील काही भाग."
एक टिप्पणी भेजें