-->
बालाघाट- तुमसर-भंडारा राष्ट्रीय महामार्ग दुरूस्तीची दखल न घेतल्यास ५ सप्टेंबर ला  आंदोलन करण्याचा इसारा!. --  आ.राजू कारेमोरे.

बालाघाट- तुमसर-भंडारा राष्ट्रीय महामार्ग दुरूस्तीची दखल न घेतल्यास ५ सप्टेंबर ला आंदोलन करण्याचा इसारा!. -- आ.राजू कारेमोरे.

दिगंबर देशभ्रतार 
"सापताहीक जनता की आवाज"  

तुमसर : भंडारा-तुमसर-बालाघाट या राज्य महामार्गा चे रूपांतरण राष्ट्रीय महामार्गात करण्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने केली परंतु त्यांच्या अजूनपर्यंत डी.पी.आर संबंधित विभागाला सादर झाला नाही अशी माहिती आहे. तर या मार्गाचे मान्सून पूर्व खड्डे बुजविण्याचे काम उन्हाळ्यात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करणे गरजेचे असतांना येथे पावसाळा लागला असला तरी अद्यापही संबंधित विभागाला खड्डे

बुजविण्याचा मुहूर्त सापडला नाही. भंडारा-तुमसर-बपेरा-

बालाघाट या राष्ट्रीय महामार्गावरून रेतीची व कोळशाची जडवाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. परिणामी ऐन पावसाळ्यात सदर मार्गावर ठिकठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. खड्ड्‌यात पावसाचे पाणी साचले आहे. परिणामी सदर मार्गावर दर दिवशी अपघात घडत असतात. तर कित्येक वाहनचालकांना अंपगत्व आले आहे. काही मृत्यूमुखी पडले

आहेत. राष्ट्रीय महामार्गाची अवस्था खड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी झाली आहे. परिणामी सदर भंडारा-तुमसर-बालाघाट राष्ट्रीय महामार्ग हा मृत्यूला आमंत्रण ठरत आहे. याकडे संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाचे व प्रशासन  अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. सदर नागरिकांच्या समस्येची दखल घेत आ. राजू कारेमोरेंनी ५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता नागरिकांसमवेत खापा चौकात चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेल्या निवेदनातून दिला आहे. परिणामी संबंधित सार्वजनिक बांधकाम

विभागात खळबळ उडाली आहे. शहरी भागापासून ते ग्रामीण

बालाघाट-तुमसर-भंडारा या मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतरण झाल्याची घोषणा केंद्रीय मंत्र्यांकडून करण्यात आली. परंतु अद्याप या मार्गाच्या कामाला सुरुवात करण्यात आली नाही. सदर राष्ट्रीय मार्गावर ठिक ठिकाणी खड्डे पडले आहेत. परिमाणीनागरिकांना व वाहनचालकांना अपघाताला व मृत्यूला सामोरे जावे लागत आहे. या संबधी मला तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तरी संबंधित विभागाने तत्काळ या मार्गाची दुरुस्ती करावी अन्यथा नागरीकांसमवेत खापा चौकात ५ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता चक्का जाम आंदोलन करण्यात येईल.

भागापर्यंत दळणवळणाच्या सुविधा पुर्णत्वास नेण्यासाठी नवीन मार्गाचे व राज्य मार्गाचे राष्ट्रीय मार्गात रुपांतरण केले जाते. त्या धर्तीवर राज्य शासन व केंद्र शासन आप आपल्या अनधिस्त राज्य व राष्ट्रीय मार्गाचे रुपांतर करुन महामार्गाचे जाळे विणून नागरीकांना पायाभूत सुविधा पुरविण्याचे काम करीत असतात. परंतु याच मार्गावरून अवजड वाहतूक केली जात असल्याने सदर भंडारा -तुमसर-बालाघाट राष्ट्रीय मार्गाची दुरावस्था झाली आहे. परिणामी नागरीकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे.

सुरक्षित रस्ते असावे अशी हमी शासनाकडून दिली जाते. राष्ट्रीय

महामार्गाचे जाळे निर्माण केले जात आहे. केंद्रीय रस्ते महामार्ग मंत्र्यांनी भंडारा-तुमसर-बालाघाट या राज्य महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाच्या दर्जा घोषित केला त्याचे स्वागत करण्यात आले. राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात लवकरच होईल अशी घोषणा त्यावेळी मंत्र्यांनी केली. परंतु अजूनपर्यंतया महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली नाही केवळ कागदपत्रे सोपस्कार पार पाडण्याची क्रिया सुरू असल्याची माहिती आहे. त्यामुळे सदर मार्गाच्या कामाचा मुहूर्त सार्वजनिक बांधकाम विभागाला केव्हा मिळणार? असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे.

0 Response to "बालाघाट- तुमसर-भंडारा राष्ट्रीय महामार्ग दुरूस्तीची दखल न घेतल्यास ५ सप्टेंबर ला आंदोलन करण्याचा इसारा!. -- आ.राजू कारेमोरे."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article