आमदार राजू कारेमोरे यांच्या आंदोलनाला स्थगिती.
गुरुवार, 4 सितंबर 2025
Comment
• १४ सप्टेंबर पर्यंत रस्ता दुरुस्ती करिता जिल्हा अधिकाऱ्यांनी मागितली वेळ
दिगंबर देशभ्रतार
"साप्ताहिक जनता की आवाज"
तुमसर :- प्राप्त माहिती नुसार वृत्त असे की बालाघाट तुमसर भंडारा महामार्ग हा सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी राष्ट्रीय महामार्ग घोषित केला होता परंतु त्याची कारवाई अजून पर्यंत डीपी दिला मंजूर करून अहवाल सादर करण्यात आला नाही व मंजूर रस्त्याचे बांधकाम झाले नाही त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर अनेक खड्डे जीव घेणे निर्माण झाले आहे व अनेकाचे प्राण जीवनात मुकले आहे खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे अशी अवस्था राष्ट्रीय मार्गाची झाली आहे करिता तुमसर विधान परिषद क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे यांनी रस्ता दुरुस्ती न झाल्यास 5 सप्टेंबरला आंदोलनाचा निवेदनाद्वारे इसारा दिला होता निवेदनाची दखल घेऊन मा. जिल्हाधिकारी यांनी १४ सप्टेंबर पर्यंत रस्ता दुरुस्ती करण्याकरिता वेळ मागितल्यामुळे आमदार राजू कारेमोरे यांनी आंदोलन मागे घेतले आहे.
0 Response to "आमदार राजू कारेमोरे यांच्या आंदोलनाला स्थगिती."
एक टिप्पणी भेजें