दारू बंदीसाठी मिरेगाव येथील महिलांचा एल्गार! पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन.
गुरुवार, 4 सितंबर 2025
Comment
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
साकोली/लाखनी :- लाखनी तालुक्यातील व पोलीस स्टेशन साकोली अंतर्गत येत असलेल्या मौजा मिरेगाव येथे गेल्या अनेक वर्षापासून अवैद्य मोहा फुलाची देसी, विदेशी दारू फार मोठ्या प्रमाणात विकल्या जात असून अनेकदा अवैध्य व्यवसायिकांना सांगून सुद्धा त्यांनी आपला व्यवसाय बंद न करता छुप्या मार्गाने दारूची अवैद्य विक्री सुरूच असल्याने शेवटी मिरेगाव येथील महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समिती आणि ग्रामपंचायत चे पदाधिकारी आणि गावातील महिला बचत गटाच्या महिलांनी समोर येऊन दारूबंदीसाठी एल्गार पुकारला आणि मिरेगाव येथील अवैद्य देशी दारूचे समुच्च उच्चाटन करण्याकरिता दिनांक 2 सप्टेंबर 2025 रोजी पोलीस अधीक्षक माननीय नरून हसन भंडारा यांना निवेदन देऊन मेरे गाव येथे असलेले अवैद्य देशी दारू बंद करण्याची विनंती केली. मिरेगाव हे दोन हजार लोकसंख्येचे गाव असून या ठिकाणी अवैद्य देशी दारूचे सात दुकाने आहेत या दुकानांमध्ये मोहा पुलाची देशी विदेशी अशा प्रकारचे दारू मिळत असून ती कायमची बंद व्हावी व येथील तरुण वर्ग महिला वर्ग आणि शाळकरी मुलांवर त्यांच्या परिणाम होऊ नये यासाठी तंटामुक्त ग्राम समिती ग्रामपंचायत कार्यालय महिला बचत गट यांनी पुढाकार घेऊन कायमची दारू हद्दपार व्हावी यासाठी पोलीस स्टेशन साकोली, जिल्हा उत्पादन शुल्क अधिकारी भंडारा यांना सुद्धा निवेदन देण्यात आले. परिसरातील पंचक्रोशीत भुगाव मेंढा सोनमाळा बरडकिनी खंडाळा सासरा गिरोला या गावात दारूबंदी पूर्वीपासून असून मेरे गाव या गावी तळी रामाची फार मोठ्या प्रमाणात गर्दी असायचे त्यामुळे महिला वर्गांना आणि शाळकरी मुलांना त्यांच्या फार त्रास होत होता एवढेच नव्हे तर तरुण वर्ग नशेच्या आहारी जाऊन चोऱ्या करणे वादविवाद घालने, झगडे करणे हे नित्याचे झाले असून अनेकदा समज देऊन सुद्धा येथील दारू विक्रेत्यांनी अवैध दारू विकणे थांबवले नाही त्यामुळे पोलीस अधीक्षक साहेबांना निवेदन देऊन संपूर्ण गाव दारूमुक्त करण्याची मागणी करण्यात आली निवेदन देतेवेळी सरपंच सौ यशस्वी नंदेश्वर पोलीस पाटील शुभम मेश्राम तंटामुक्त ग्राम समितीचे अध्यक्ष पत्रकार कल्याण राऊत उपसरपंच कृष्णा मानकर ग्रामपंचायत सदस्य राजू गजभिये ग्रामपंचायत सदस्य शशी कला, गजबे, प्रमिला कुंबरे, मनीषा बिसनकार, शिल्पा मेश्राम, भालेकर ताई सामाजिक कार्यकर्ते रजनी राऊत वंदना विश्राम दुर्गा बिसनकार, प्रतिमा निर्वाण, सौ इंदू जवंजाळ, सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष जगदीश बावनकुळे कैलास नेवारे लुकेश नेवारे इत्यादी, उपस्थित होते.
0 Response to "दारू बंदीसाठी मिरेगाव येथील महिलांचा एल्गार! पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन."
एक टिप्पणी भेजें