श्रावण बाळ व संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना नियमित मानधन द्या. - महामाया महिला सामजिक न्याय संघटना.
गुरुवार, 4 सितंबर 2025
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्त प्रतिनिधी
भंडारा :- राज्यात श्रावण बाळ संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात असून त्यांना जीवन जगण्याकरिता अतिशय अल्प मानधन मिळतो ते मानधन दर महिन्याला नियमित न मिळता तीन ते चार किंवा पाच ते सहा महिन्यांनी भेटत असते त्यामुळे त्यांचे जीवन जगणे अतिशय कठीण होत आहे त्यांचे मानधन अतिशय तुटपुंजी असल्याने त्यांच्या मानधनात वाढ करण्यात यावी व ते मानधन नियमित दर महिन्याला देण्यात यावे तसेच बँकेमार्फत लादलेल्या ज्याचक अटींची पूर्तता करण्यासाठी ग्रामीण स्तरावर ग्रामपंचायतने विशेष सहकार्य करावे या पद्धतीचे निवेदन जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री यांना पाठवण्यात आले आहेत याप्रसंगी महामाया महिला सामाजिक न्याय संघटनेचे संस्थापक डी जी रंगारी, अध्यक्ष शितल नागदेवे, प्रवक्ता पारीका रामटेके , राणी राऊत, प्रिया शहारे ,भिकुनी सुप्रज्ञा, कीर्ती गणवीर, विदर्भ प्रमुख रत्ना खंडारे ,मृणाली कोल्हे, हर्ष ठवकर ,कीर्ती गणवीर व इतरही महिला याप्रसंगी उपस्थित होते
0 Response to "श्रावण बाळ व संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना नियमित मानधन द्या. - महामाया महिला सामजिक न्याय संघटना. "
एक टिप्पणी भेजें