-->
अड्याळ पोलीस स्टेशन येथे गणरायाला ढोल ताशांच्या गजरात शेवटचा निरोप

अड्याळ पोलीस स्टेशन येथे गणरायाला ढोल ताशांच्या गजरात शेवटचा निरोप

संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज"

भंडारा :- पवनी तालुक्यातील अड्याळ पोलीस स्टेशन येथे दिनांक 27 ऑगस्टला गणरायाची स्थापना करण्यात आलेली होती व आज दिनांक 1 सप्टेंबर 2025 ला सायंकाळी 8 वाजता ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीत 6 व्या दिवशी गणराया बाप्पाला अखेरचा निरोप देण्यात आला.   यावेळी अड्याळ पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी, अड्याळ पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेले पोलीस पाटील, पत्रकार व नागरिक व महिला बहुसंख्येने गणेश विसर्जनाच्या वेळेस उपस्थित होते. सर्वांना अड्याळ पोलीस स्टेशन तर्फे जेवणाची सुद्धा व्यवस्था करण्यात आली होती. गणेश विसर्जन रॅलीत सर्व कर्मचारी व सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी सुद्धा गणेश विसर्जनाचा आस्वाद घेतला.

0 Response to "अड्याळ पोलीस स्टेशन येथे गणरायाला ढोल ताशांच्या गजरात शेवटचा निरोप "

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article