भीम आर्मी खमारी तर्फे नवनियुक्त तंटामुक्ती अध्यक्ष यांचे स्वागत.
सोमवार, 1 सितंबर 2025
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्त प्रतिनिधी
भंडारा/खमारी (बुटी) :- आज दिनांक 31/08 /2025 ला खमारी (बुटी)तहसील जिल्हा भंडारा येथील नवनिर्वाचित तंटामुक्ती अध्यक्ष श्री. बालारामजी पवनकर यांचे भीम आर्मी संघटन जिल्हा भंडारा च्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी भीम आर्मीचे भंडारा जिल्ह्याचे जिल्हा संघटक - महेंद्रजी बन्सोड, भंडारा तालुका उपाध्यक्ष- युगांतरजी मेश्राम ,भीम आर्मीचे कार्यकर्ते - असुराजजी मारवाडे, अजयजी बन्सोड ,राजनजी उके, जगदीशजी मोहरकर ,पुरुषोत्तमजी मेश्राम ,दिनेशजी पेशने ,अशोकजी फेंडर ,असे अनेक भीम आर्मीचे कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित तंटामुक्ती अध्यक्ष बालारामजी पवनकर यांनी आपले मत व्यक्त केले आणि ते म्हणाले की गावात शांतता टिकवून ठेवण्यासाठी आणि गावाला तंटामुक्त करण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहीन.तसेच भिम आर्मि तालुका उपाध्यक्ष तडफदार युवा नेतृत्व युगांतरजी मेश्राम यांनी आपले मत व्यक्त केले आणि ते म्हणाले की ज्या गावात ज्या जिल्ह्यात ज्या तालुक्यात जिथे जिथे अन्याय अत्याचार होईल तिथे तिथे भीम आर्मी संघटन न्याय देण्याचे काम करेल व करत राहील. कारण आमच्या संघटनेचे ब्रीद वाक्यच हे आहे,की -"जोर जुल्म की टक्कर में संघर्ष हमारा नारा है" असे ते म्हणाले*.
0 Response to "भीम आर्मी खमारी तर्फे नवनियुक्त तंटामुक्ती अध्यक्ष यांचे स्वागत."
एक टिप्पणी भेजें