-->

Happy Diwali

Happy Diwali
पिसाळलेल्या कुत्र्याने तिघांचा घेतला चावा! परसोडी (तई तालुका लाखांदूर) येथील घटना , सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचारार्थ दाखल.

पिसाळलेल्या कुत्र्याने तिघांचा घेतला चावा! परसोडी (तई तालुका लाखांदूर) येथील घटना , सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचारार्थ दाखल.


नरेंद्र मेश्राम 
"साप्ताहिक जनता की आवाज"

भंडारा/परसोडी (तई ) :- येथे पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला तिघांचा चावा! सामान्य रुग्णालय भंडारा येथे दाखल , पिसाळलेल्या कुत्र्याने एकाच दिवशी तिघांवर हल्ला चढवीत गंभीर जखमी केले. यात सचिन दुधराम ढोके(३६), देवेंद्र अशोक मेश्राम (३५), प्रीती विलास भेंडारकर (६) तिघेही राहणार परसोडी (तई) तालुका लाखांदूर असे जखमींचे नाव आहे. ही घटना रविवारला दुपारच्या दरम्यान घडली. गावातीलच एका कुत्र्याने हल्ला चढवीत वाटेत मिळालेल्या व्यक्तींवर बेधडक हल्ला चढविला. यात दोन युवकांसह एका शाळकरी मुलीला गंभीर जखमी केले. गावात एकच दहशत पसरली. पिसाळलेल्या कुत्र्याचा मात्र त्यानंतर बंदोबस्त करण्यात आला. जखमी भंडारा येथे सामान्य रुग्णालयात वार्ड क्रमांक १७ येथे उपचार घेत आहेत. पालांदूर येथील सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक युवराज खोब्रागडे यांना बातमी कानी पडताचं थेट रुग्णालयात रुग्णांची भेट घेतली. त्यांच्या उपचारांकरिता डॉक्टरांशी चर्चा केली. चौकट /डब्बा कुत्रा पाळणाऱ्यांनी कुत्र्याला रेबीजचे इंजेक्शन देऊन सुरक्षितता बाळगणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मोकाट कुत्र्यांना सुद्धा स्थानिक प्रशासनाने जेरबंद करून त्यांच्यावर सुद्धा रेबीज इंजेक्शन लावणे गरजेचे आहे. देवेंद्रला नागपूरला हलविले! देवेंद्र मेश्राम याला जखम खोल पर्यंत असल्याने पुढील उपचारार्थ नागपूर येथे हलविल्याचे कळले आहे. तर सचिन दुधराम ढोके सुट्टी देण्यात आल्याचे समजले. 

0 Response to "पिसाळलेल्या कुत्र्याने तिघांचा घेतला चावा! परसोडी (तई तालुका लाखांदूर) येथील घटना , सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचारार्थ दाखल."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article