गोंदी येथे राजस्व अभियानांतर्गत पाणंद रस्त्याचे सर्वेक्षण
मंगलवार, 23 सितंबर 2025
Comment
• महसूल विभागाचे स्तुत्य उपक्रम शेतकऱ्यांना मिळणार हक्काचा रस्ता.
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
पालांदूर :- शेतवाट (पाणंद) सुरळीत करण्याच्या अनुसंगाने राज्यातील महसूल विभागाने शेतकऱ्यांकरितास्तुत्य उपक्रम राबविला आहे. शिवार फेरी घालत पानंद रस्त्याची मोजणी करीत नकाशावर घेणे व अधिकृतपणे शासनाच्या पोर्टलवर नोंद करून शेतकऱ्यांना हक्काचा रस्त्याची वाट मोकळी करून देण्याचे नियोजन सुरू आहे. तलाठी मुस्कान शेख यांच्या हस्ते मोजणी व सर्वेक्षण सुरू असून प्रमुख उपस्थिती गावचे प्रथम नागरिक गणेश हत्तीमारे उपस्थित होते.
शेतरस्ते शेतकऱ्यांच्या प्रगतीतील मुख्य वाट आहे. शेतमालाची ने आण करण्याकरिता रस्ते अत्यंत महत्त्वाचे ठरतात. मात्र बरेच शेत रस्ते हे अतिक्रमणयुक्त व कागदावरच असल्याचे अभ्यासांती पुढे आले आहे. त्यांची योग्य ती खातरजमा करून घ्यावी, याकरिता राज्याच्या महसूल विभागाने धोरणाखीत शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरू केला आहे.
सर्वेक्षण करतेवेळी शेतकरीवर्ग, ग्रामपंचायत कर्मचारी , रोजगार सेवक, संतोष मेश्राम, युवराज शहारे, नेपाल थेर, प्रवीण मेश्राम व साधू शिवणकर उपस्थित होते.
0 Response to "गोंदी येथे राजस्व अभियानांतर्गत पाणंद रस्त्याचे सर्वेक्षण "
एक टिप्पणी भेजें