गोंदिया जिल्हा नियोजन समिती बैठक
शुक्रवार, 12 सितंबर 2025
Comment
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- आज शुक्रवार, दि. १२ सप्टेंबर २०२५ रोजी गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे जिल्हा नियोजन समितीची बैठक मा.ना. बाबासाहेब पाटील, सहकार मंत्री तथा पालकमंत्री, गोंदिया जिल्हा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या बैठकीत जिल्ह्यात सुरू असलेल्या विकासकामांचा व समस्यांचा आढावा घेण्यात आला तसेच आगामी काळातील विकासकामांच्या नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत विशेषतः पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, घरकुल, भूमि अभिलेख, पट्टे, मालकी हक्क, जलजीवन मिशन, ओव्हर ब्रिज, रोजगारनिर्मिती, पाणीपुरवठा, कृषी, पशुसंवर्धन, मत्स्यपालन, स्मार्ट मीटर, रस्ते, शेती व धान खरेदी या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली.
प्रमुख मुद्दे
शेतकऱ्यांना मागील वर्षीच्या रब्बी हंगामाचे प्रलंबित पैसे तसेच यावर्षीचे पैसे तातडीने खात्यात जमा करण्याची मागणी.
स्मार्ट मीटरमुळे येणाऱ्या अतिरिक्त बिलांबाबत तक्रारी नोंदवून त्यावरील अन्याय थांबविण्याची सूचना.
रोड सेफ्टी कमिटी अजून गठीत न झाल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त.
अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रे इमारती तयार असूनही कार्यान्वित नसल्याचे व काही ठिकाणी कायमस्वरूपी डॉक्टर नसल्याचे प्रश्न मांडले.
रोजगार निर्मितीसाठी ठोस पावले उचलण्याची आवश्यकता अधोरेखित केली.
निधी वाटपात भेदाभेद न करता जिल्ह्याचा संतुलित विकास व्हावा, यावर भर.
बैठकीदरम्यान अनेक अधिकारी कामचुकार वृत्तीने अधुरी माहिती सादर करत असल्याचे व काही अधिकारी कारण नसतानाही अनुपस्थित राहतात, याबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली व याकडे विशेष लक्ष देण्याची सूचना करण्यात आली.
बैठकीत उपस्थित
मा.ना. बाबासाहेब पाटील, सहकार मंत्री तथा पालकमंत्री, गोंदिया जिल्हा,श्री. लेकरामजी भेंडारकर, अध्यक्ष जि.प. गोंदिया,खा. नामदेवरावजी किरसान,खा. डॉ. प्रशांत पडोळे,आ. अभिजीतजी वंजारी,आ. परिणयजी फुके,आ. विनोदजी अग्रवाल,आ. विजयजी रहांगडाले,आ. संजयजी पुराम,आ. राजकुमार बडोले
तसेच जिल्हा परिषदेचे सदस्य, मा.जिल्हाधिकारी गोंदिया व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत जिल्ह्यातील जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण करताना शाश्वत व सर्वांगीण विकास साधण्यासाठी कार्ययोजना निश्चित करण्यात आली.
0 Response to "गोंदिया जिल्हा नियोजन समिती बैठक"
एक टिप्पणी भेजें