ग्रामस्थरीय कार्यशाळेचे आयोजन संपन्न.
शुक्रवार, 12 सितंबर 2025
Comment
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- पंचायत समिती पवनी, जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत "मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान अंतर्गत मौजा अड्याळ तालुका पवनी जिल्हा भंडारा येथील सभागृहात दिनांक 11.09.2025 रोज गुरुवार ला दुपारी 12.00 वाजता कार्यशाळेला सुरुवात झाली ,सर्व प्रथम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज , यांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांनी दीपप्रज्वलन, माल्यार्पण केले,नंतर अतिथींचे स्वागत करून कार्यशाळेला सुरवात झाली,कार्यशाळेचे अध्यक्ष गावाचे सरपंच श्री शिवशंकरजी मुंगाटे हे होते, कार्यशाळेचे मुख्य मार्गदर्शक ग्रामविकास अधिकारी कु पौर्णिमा जे.साखरे मॅडम होत्या,प्रमुख उपस्थिती तलाठी श्री शरद गाढवे,तहसील कार्यालयाचे संगणक ऑपरेटर सं गां यो.श्री कृष्णा कुथे,ग्राम तंटामुक्त समिती अध्यक्ष श्री मुनीश्वर मो. बोदलकर, ग्रामपंचायत सदस्य श्री आशीक जी अंबादे, ग्राम पंचायत सदस्य श्री पंकज ढोक, सामाजिक कार्यकर्ते श्री अमोल उराडे , ग्रामपंचायत सदस्या सौ वासुश्री टेंभुर्णे,श्रीमती नम्रता मडकवार,सौ मनोरमा मडावी,सौ शिल्पा गभने,सौ,पुष्पमाला कोहाड, आंगणवाडी सेविका सौ स्मिता अंबादे,सौ .भावना टेकाम, सौ कल्पना ढवळे, आशा दिदी सौ साधना कासारे,प्रतिमा जनबंधू,सौ रेखा कुंभलकर, सौ करिष्मा मोहरकर, ग्रा प लिपीक रामाजी न्यायमूर्ती,इतर कर्मचारी ,गावातील नागरिक,महिला यांनी कार्यशाळेचा लाभ घेतला,प्रमुख मार्गदर्शक कु.साखरे मॅडम यांनी उपस्थिताना गावाची स्वच्छता,करवसुली, स्वच्छता अभियान अंतर्गत तालुका स्तर,जिल्हा,विभागीय स्तर, राज्याचे पुरस्कार याबाबत विशेष मार्गदर्शन केले.त्याचप्रमाणे कार्यशाळेचे अध्यक्ष सरपंच श्री शिवशंकरजी मुंगाटे साहेब यांनी गावाच्या स्वच्छतेकरीता सर्व नागरिकाच्या श्रमदान,सहभागाची अपेक्षा व्यक्त केली,या कामाकरीता गावातील श्री गणेशोत्सव मंडळ, दुर्गा उत्सव मंडळ, शारदा उत्सव मंडळाने सहभाग द्यावा,असे सांगितले, तंटामुक्त समिती अध्यक्ष श्री मुनीश्वर बोदलकर यांनी उपस्थिताना शेतीविषयक, इ पीक पाहणी ,शासनाच्या विविध योजना बद्दल मार्ग दर्शन केले,सामाजिक कार्यकर्ते श्री अमोल उराडे गावातील समस्या सोडविण्याबाबत, स्वच्छता अभियानाबाबत लोकसहभागाबाबत ,ज्या सामाजिक संघटनेने चांगले कार्य केले त्यांचा ग्रामपंचायत कडून पुरस्कार, सत्कार करण्याबाबत विचार मांडले,सर्व मान्यवांनी उपयुक्त मार्गदर्शन केले, कार्यक्रमाचे संचालन ग्रामविकास अधिकारी साखरे मॅडम यांनी केले, शासनाच्या परिपत्रकानुसार विशेष असे सखोल उपयुक्त मार्गदर्शन केले,, कार्यशाळेला उपस्थित सर्वांचे आभार मानून समारोप केले,,,
0 Response to "ग्रामस्थरीय कार्यशाळेचे आयोजन संपन्न."
एक टिप्पणी भेजें