-->
दादासाहेब फाळके चित्रपट युनियन मीडिया विभागाच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी संतोष शिवदास आमले यांची नियुक्ती.

दादासाहेब फाळके चित्रपट युनियन मीडिया विभागाच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी संतोष शिवदास आमले यांची नियुक्ती.

संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

नागपूर :- दादासाहेब फाळके चित्रपट युनियनचे अध्यक्ष अजित म्हामुणकर यांनी मीडिया क्षेत्रातील केलेल्या कामाची दखल घेऊन मीडिया विभागाच्या महाराष्ट्र राज्याध्यक्षपदी पनवेलचे रहिवासी व दैनिक युवक आधारचे संपादक श्री. संतोष शिवदास आमले यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे सिनेसृष्टीत तसेच सामाजिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर स्वागत होत आहे. कलाकार दिग्दर्शक यांच्याशी चांगला संपर्क असून सामाजिक क्षेत्र व पत्रकार क्षेत्रामध्ये दैनिक युवक आधार च्या माध्यमातून आमले यांची वेगळी ओळख निर्माण झाली असून मीडिया क्षेत्रात संघटनेच काम वाढवण्यास मदत होईल.

युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “मीडिया विभाग हा चित्रपटसृष्टीतील कलाकार, तंत्रज्ञ आणि पत्रकार यांच्यातील दुवा मानला जातो. श्री. आमले यांच्या नेतृत्वाखाली हा विभाग अधिक सक्षम होईल आणि महाराष्ट्रभरातील माध्यम प्रतिनिधींना योग्य व्यासपीठ उपलब्ध होईल, असा आम्हाला विश्वास आहे.”

कोट
सामाजिक व सांस्कृतिक कार्यात सक्रिय
संतोष आमले हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक उपक्रम, कला व सांस्कृतिक चळवळींमध्ये अग्रेसर आहेत. विविध संस्थांमार्फत त्यांनी युवकांना प्रोत्साहन दिले असून पत्रकारिता आणि समाजकारण क्षेत्रात त्यांचे वेगळे स्थान निर्माण झाले आहे.

 दिग्दर्शक व अभिनेता विकास वायाळ
आमले यांची भूमिका

आपल्या निवडीबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना श्री. आमले म्हणाले,
“दादासाहेब फाळके चित्रपट युनियनच्या मीडिया विभागाचे महाराष्ट्र राज्याध्यक्षपद मिळणे ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे. चित्रपटसृष्टीतील कामगार, कलाकार, तंत्रज्ञ तसेच पत्रकार यांना न्याय, सुविधा आणि योग्य मान-सन्मान मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. महाराष्ट्रातील सिनेसृष्टीचा गौरव वाढवणे हेच माझे ध्येय असेल.”

कोट

या नियुक्तीबद्दल श्री. आमले यांचे विविध मान्यवर, पत्रकार, कलाकार व सामाजिक कार्यकर्त्यांकडून हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या कार्यकाळात मीडिया विभाग अधिक गतिमान होईल आणि दादासाहेब फाळके यांचे नाव उज्ज्वल ठेवणाऱ्या चित्रपटसृष्टीच्या वाटचालीत मोलाची भर पडेल, असा विश्वास आहे 
-अजित म्हामुणकर अध्यक्ष दादासाहेब फाळके चित्रपट युनियन

0 Response to "दादासाहेब फाळके चित्रपट युनियन मीडिया विभागाच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी संतोष शिवदास आमले यांची नियुक्ती."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article